सांस्कृतिक वारसा समृद्ध करणारा देशातील व देशाबाहेरील प्रज्ञावंतांना सन्मानाने बडोद्यात बोलावून या ज्ञानांचा उपयोग त्यांनी करून घेतला.
प्राचीन साहित्य हा आमचा सांस्कृतिक ठेवा आहे. त्याचे जतन, रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्राच्यविद्या मंदिराची सुरुवात इ.स. १८९३ साली पाटण येथे सुरुवात केली होती. हे काम आणखी नेटाने व्हावे म्हणून बडोदा शहरात गायकवाड प्राच्याविद्या मंदिर सुरू केले. या संस्थेच्या माध्यमातून जुन्या संस्कृत, पाली, मराठी, गुजराथी, हिंदी ग्रंथाचे संशोधन - प्रकाशनाचे काम हा हिंदुस्थानातील सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा महाराजांचा फार मोठा प्रयत्न होता. यातून श्रीसयाजीमाला, श्रीसयाजी ज्ञानमाला तसेच शिक्षण विभागातर्फे अनेक ग्रंथ प्रकाशित केले. इ.स. १९१० साली उभे राहिलेली सेंट्रल लायब्ररी ही तर त्याकाळात आशिया खंडातील एक मोठे ग्रंथालये होते. चित्र, शिल्प ही संस्कृती ही संस्कृती संवर्धनाचे एक अंग आहे. त्यांचे संग्रहालय उभे करून जनतेला हा अनमोल वारसा उपलब्ध करून दिला.
सरस्वती आणि लक्ष्मीची कृपा असलेले प्रज्ञावंत :
महाराजा सयाजीराव हे हिंदुस्थानातील एक अनमोल अद्भुत उदाहरण आहे. सर्वसाधारणपणे सरस्वती अन् लक्ष्मी एका ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे फारसे दिसत नाही. सयाजीराव शेतकऱ्याचा एक मुलगा म्हणून जन्मले, पुढे बडोद्याचे