एक कर्तव्यभावना दिसून येते. यासच ते 'तो माझा मोक्ष आहे' असे द्रष्टेपणाने म्हणत. समाजात धर्माचे महत्त्व आहे. धर्माच्या संबंधाने समाजात अनेक रूढी- परंपरा वर्षानुवर्षे पाळल्या जातात. या धर्माची ओळख स्वतःस व्हावी या शिक्षण जिज्ञासेपोटी त्यांनी प्रमुख धर्माची मूलतत्त्वे तज्ज्ञांकडून समजावून घेतली. हिंदू धर्मातील चार वेदांचे सार संस्कृत पंडितांच्या मदतीने माहीत करून घेतले. या अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले, सर्व धर्मांची मूलतत्त्वे मानवी कल्याणाचा विचार करणार आहेत, पण समाजात रूढी-परंपरा, विधीच्या कर्मकांडातून अनेक वाईट गोष्टींचा यात शिरकाव होत गेला. यातून जनसामान्यांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत गेले. यावर उपाय म्हणजे शिक्षणाच्या मदतीने सामाजिक व धार्मिक सुधारणांची डोळसपणे सांगड घालणे होय.
त्याकाळात बऱ्याच मोठ्या प्रमाणात बालविवाह प्रचलित होते. बालवयात लग्न केल्याने मुलांचे शिक्षण, संसाराची जबाबदारी या गोष्टी दूर जात. इ.स. १९०४ साली यावर बालविवाह प्रतिबंधक कायदा करून मुलांचे १६ वर्षे मुलीचे १२ वर्षे वयाचे बंधन घातले. कायदा मोडणारास शंभर रुपये दंड सुरू केला. त्याकाळात स्त्रियांसाठी गोषाबंदी पाळली जाई. महाराणी चिमणाबाई यांनी स्वत: गोषापद्धतीचा त्याग केला. पुढे गोषाबंदीचा कायदा केला. अकाली पती निधनानंतर आयुष्यभर विधवा म्हणून आयुष्य काढणाऱ्या स्त्री जातीसाठी विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा केला. यासोबत घटस्फोटांचा