पान:समता (Samata).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पोलीस स्टेशनमधील महिला सहाय्यता कक्षाचे कामकाज कसे चालते ? प्रत्येक पोलीस स्टेशनलासुध्दा महिला सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महिला सामाजिक कार्यकर्त्यांची दक्षता समिती सदस्य म्हणून निवड करता येते. महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये त्यांची मदत घेतली जाते. येणा-या महिलांच्या तक्रारींबाबत प्रत्येक शनिवारी पोलीस स्टेशनला समुपदेशनाचे काम चालते. एक थांबा आपत्ती निवारण केंद्र हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांच्या विविध गरजा एकाच ठिकाणी भागविणारी केंद्र उभारणे. या ठिकाणी वैद्यकिय मदत, कायदेशीर मार्गदर्शन मानसिक आधार तसेच त्या महिलेची व तिच्या मुलांची तात्पुरत्या स्वरुपात निवासाची सोय करणे अशा सर्व प्रकारच्या सोयी एका छताखाली उपलब्ध केल्या जातात. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांनाही येथे मदत मिळते. मानसिक आधार, तातडीची वैद्यकिय मदत आणि संवेदनशील पध्दतीने तिचा जबाब नोंदवून घेण्यावर भर दिला जातो. लेक लाडकी अभियान शिरुर (का) (३५)