Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशंसा केलेली देखील लोकांस आवडत नाहीं. याचे कारण, एकंदर लोकांचें अज्ञान हे(य. कारण, परभू, शेणवी या जाती प्रस्तुत काळी जरी निराळचा पडून ब्राह्मणांत व त्यांच्यांत उंच नीच पणाचे बाद आणि समजुती माजत चालल्या आहेत तथापि मूळ सर्वांचें एकच आहे. या जातीच संबंधाने आमच्या लोकांत हल्ली फारच वेड माजून गेले आहे. ब्राह्मण, परभू, शेणवी, कांसार, लोहार, तेली, वाणी, गुजर, मुस लमान इत्यादि अनेक जाती उत्पन्न होऊन त्या प्रत्येक जातीत शेकडों पोटभेद झाले आहेत. त्या पोटभेदांतही श्रेष्ठकनिष्टपणा मानून लोक एकमेकांचा द्वेष करितात, मग अनेक जाती परस्परांशी अयोग्य रिती नें व द्वेषानें वागतील यांत नवल ते काय? वरील भेद हे फक्त स्वदेश संबंधानें झाले आहेत. या खेरीज इंग्रज, पारशी, यहुदी, चिनी, आरबी आफगणी इत्यादि परदेशी लोकांचे अनेक भेद आहेत. आतां याचा विचार करून पाहतां आपण जरी हे शेंकडोंशे भेद मानून सगळा विच का करून टाकिला आहे. तथापि या सर्व जाती महान विद्वानांनी पत्र जे चार वर्ण करून ठेविले त्यांत येतात. हल्डींचे लक्षावधी जातीचे लोक या चार वर्षांचे बाहेर जात नाहींत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यश हे मुख्य चार वर्ण होत. या चार वर्णीची उत्पत्ती परमेश्वरानें कशी केली हे सांगण्यांत तर विद्वान आपले चातुर्याची सीमा केली आहे. हे चार वर्ण आरंभी पुढे सांगितल्याप्रमाणे उत्पन्न झाले आहेत:- ब्राह्मणोस्य मुखमासीबाहू राज्यभ्यः कृतः ।. उरू तदस्य यद्वैश्यः पभ्द्यांद्रो अजायत । “परमेश्वराच्या मुखा पासून ब्राह्मण उत्पन्न झाले; बाहूपासून क्षत्रिय, ऊरूं पासून वैश्य, आणि पायांपासून शूद्र उत्पन्न झाले." असे पुरुष सक्तांत सांगितले आहे. प्रार्थना समाजांतील लोक -- आतां आमची एकेश्वरी पंथांतील मंडळी, व ब्रह्मसमाजाचे अभिमानी हे हे सर्वच खोटें