पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. जवळ आली म्हणून त्यांनी रामदासांकडे जाऊन आपली संशयनिवृत्ति करून घ्यावी म्हणून वामनपंडितास सांगितले. म्हणून वामन पंडित तिस- ज्यांदां रामदासांकडे आले व या खेपेस मात्र रामदासांच्या सहवासांत वामनपंडित ज्ञानपूर्ण व निःसंशय झाले. तरी पण दासबोधांतील सातव्या दशकांतील चवदा ब्रह्मांच्या प्रश्नाचा उलगडा त्यांच्या मनाला बरोबर झाला नाहीं. म्हणून त्यांनीं 'दासबोधाचें मी स्वतः पारायण करतों व स्वामीनीं स्वमुखें त्यांचा अर्थ सांगावा' अशी विनंति केली. तेव्हां चवदा ब्रह्मांविषयीं वामनानीं प्रश्न केला व त्याचें उत्तर स्वामीनीं दिले पण त्यानें पंडिताचें समाधान झाले नाहीं; असें एकदोनदां झालें तरी वामन- पंडिताची संशयनिवृत्ति होईना. तेव्हां समर्थ भुभुःकार करून शेपटाचा मोठा तडाखा देऊन बोल बोल असें वामनास ह्मणूं लागले. तो त्यांच्या त्या स्वरूपाकडे पाहून वामनपंडित भयभीत होऊन 'स्वामी माझी सम- स्या पूर्ण झाली' असें बोलला. याप्रमाणें स्वामींनीं त्रिवार विचारलें व पंडितांनीं त्रिवार पूर्वी प्रमाणें उत्तर दिले. नंतर स्वामींनी पूर्वरूप धारण करून वामनपंडितास विचारले, 'तुझी समस्या पूर्ण झाली किंवा नाहीं. ' वामनांनीं नाहीं असें उत्तर करतांच स्वामी म्हणाले. 'इतक्यांत कबूल करून आतां कां फिरतोस.' वामनपंडित ह्मणालें, आपण आद्यरुद्ररूप धारण केले त्याबरोबर बोलण्याचें सामर्थ्य कोणाचें आहे.' नंतर स्वामी हास्य करून बोलले, 'तुझीं इतके ग्रंथ वाचले असतां चवदा ब्रह्मांचा प्रश्न कोणत्याही ग्रंथी पाहिला नाहीं म्हणतां याचें आश्चर्य वाटतें. 'आतां वृहदारण्यांत चवदा ब्रह्मांची स्थापना करून उडविण्याचा प्रकार आहे तो पहा. त्यांत असल्यास आमच्या ग्रंथांत असूं द्यावा नाहीं तर काढून टाकावा ! वामनपंडितांनी स्वामींनी सांगितल्या ठिकाणीं तें प्रकरण पाहून त्यांचें पूर्ण समाधान झालें. नंतर वामनपंडितांनीं स्वामींच्या सांगीवरून मराठींत बहुत ग्रंथ केले व त्यांतील सुंदर यमकें पाहून रामदासांनी वामन- पंडिताचें ' यमक्या वामन ' असें नांव ठेविलें. 6 १ ८८ आतां रामदासांच्या चरित्रांतील इतर बाबींकडे वळू. चाफळास व परळीस मठ स्थापन करून जागजागीं मारुतीचीं देवळें बांधल्यानंतर