पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. दिसते. नंतर कांहीं दिवस साताऱ्याजवळील माहुलीस व केव्हां केव्हां जन्हांड्याच्या डोंगरावर राहूं लागले. पुढे त्यांनीं चाफळ हें गांव पसंत करून तेथें रामाचें देऊळ बांधून रामोत्सव सुरू करण्याचा निश्चय केला असे दिसतें व तदनुरूप त्यांनीं चाफळास सन १६४८ मध्यें राम- मंदिर बांधून उत्साह सुरू केला व त्यामुळे त्यांच्या भोंवतीं शिष्यसमुदाय जमूं लागला. तेव्हां रामदासांनीं दासपंथ काढून शिष्यसांप्रदायाला प्रारंभ केला. ~ याच सुमारास कऱ्हाडच्या देशपांड्याची बाळविधवा कन्या अकाबाई, तसेंच मिरजेच्या देशपांड्याची वाळविधवा कन्या वेणूबाई या रामदासांच्या शिष्यणी झाल्या व लवकरच कोल्हापुरास अंबाजी नांवाचा एक फार हुशार मुलगा रामदासांनी पाहिला व त्याला आपला शिष्य केला व तो पुढें कल्याण स्वामी म्हणून रामदासांचा पट्टशिष्य झाला. याप्रमाणें रामदासांच्या पंथाचा व त्यांच्या शिष्यसांप्रदायाचा प्रसार होऊन रामदासांची कीर्ति शिवाजीच्या कानावर गेली व त्याला रामदासां- च्या भेटीचा निजध्यास लागला. व शेवटी शिवाजीची व रामदासांची भेट चाफळ जवळील शिंगणवाडीच्या बागेत झाली व तेथें रामदासांनीं शिवाजीला गुरुमंत्र देऊन त्यावर अनुग्रह सन १६४९ मध्ये केला वगैरे या प्रसंगाचें सविस्तर वर्णन रामदासांच्या बखरींत दिले आहे. या बखरीचा या पुढचा भाग शिवाजीच्या व रामदासांच्या भेटींच्या प्रसंगाच्या वर्ण- नांनीं व शिवाजीस आपले सामर्थ्य दाखविण्याकरितां रामदासांनी केलेल्या दैवी चमत्कारांच्या वर्णनांनी भरलेला आहे. असे तीस बत्तीस प्रसंग या बखरींत दिलेले आहेत; शिवाय शिवाजीचा दर गुरुवारी रामदास स्वामी असतील तेथे जाऊन त्यांचें दर्शन घेऊन त्यांची राजकीय कामांत सल्ला मसलत घेण्याचा नेम असे असेंहि बखरींत सांगितले आहे. पण या नेमा- मुळे जागच्याजागीं व तातडीनें करावयाच्या कामांत अडचणी येऊं लाग- ल्या असें जाणून रामदासांनीं अशा एका प्रसंगीं एकदम प्रगट होऊन शिवाजीस म्हटलें, “शिवचा, तूं हो राज्यकारभार करितोस यांत कोण समय कसा प्रसंग येईल यांचा नेम नाहीं. आम्ही तर सतत तुम्हांपाशीं