पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३२

सज्जनगड व समर्थ रामदास.

ह्मणावें; भोंदू गुरु तसेंच निरनिराळ्या व्यावहारिक ज्ञानाचे व धंद्याचे गुरु हे मोक्षदायी सद्गुरु नव्हेत खरा सद्गुरु--
जो ब्रह्मज्ञान उपदेशी । अज्ञान अंधार निरसी । जीवात्मया शिवात्मयाशीं । ऐक्यता करी ॥ भवव्या घालूनि उडी । गोवत्सांस ताडातोडी । केली देखोनि शीघ्र सोडी । तो सद्गुरू जाणावा ॥ वासना नदी महापुरीं प्राणी बुडतां ग्लानि करी ।

तेथें उडी घालूनि तारी । तो सद्गुरू जाणावा ॥
प्राणी मायाजाळीं पडिले । संसारदुःखें दुखवले । 

ऐसे जेणें मुक्त केले । तो सद्गुरू जाणावा ॥   सद्गुरूच्या लक्षणानंतर एका समासांत रामदासांनी सत् शिष्यांचें लक्षण दिले आहे त्याचें सार खालील ओव्यांत आलें आहे.<bbr> मुख्य सत् शिष्याचें लक्षण | सद्गुरुवचनीं विश्वास पूर्ण । अनन्य भावें शरण । त्या नांव सच्छिष्य ।। शिष्य पाहिजे निर्मळ । शिष्य पाहिजे आचारशीळ ।

शिष्य पाहिजे केवळ । विरक्त अनुतापी ॥

शिष्य पाहिजे निष्टावंत । शिष्य पाहिजे शुचिष्मंत |

शिष्य पाहिजे नेमस्त । सर्व प्रकारों ॥

शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष । शिष्य पाहिजे परमदक्ष । शिष्य पाहिजे अलक्ष्य । लक्षी ऐसा ।। शिष्य पाहिजे अति धीर । शिष्य पाहिजे अति उदार ।

शिष्य पाहिजे अतितत्पर । परमार्थाविषयीं ॥

शिष्य पाहिजे परोपकारी । शिष्य पाहिजे निर्मत्सरी ।

शिष्य पाहिजे अर्थातरीं । प्रवेशकर्ता ॥

 पुढें निरनिराळ्या प्रकारचें ज्ञान, खरें ब्रह्मज्ञान व उपदेशाचे स्वरूप यांचे वर्णन असून दशकाच्या शेवटच्या चार समासांत बद्ध, मुमुक्षु, साधक व सिद्ध अशा मनुष्याच्या पायऱ्यांची माहिती दिली आहे. अर्थात् यांत संसारांत गढून गेलेल्या माणसापासून त्याची ज्ञानाच्या योगें.. मुक्तता