Jump to content

पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२

सज्जनगड व समर्थ रामदास.

 सकळ सुखाचा त्याग । करोनि साधिजे तो योग ।

 राज्य साधण्याची लगबग | कैसी केली ॥ २० ॥
 याहुनि करावें विशेष । तरिच म्हणावें पुरुष |
 या उपरि आतां विशेष । काय ल्याहावें ॥ २१ ॥

मराठे संतमंडळ व मराठे कविमंडळ यांच्या काव्यग्रंथां- चा व त्यांच्या भक्तिपंथाचा मराठेशाईच्या उदयाशीं किती निकट संबंध आहे हें कै० माधवरावजी रानडे यांनी प्रथमतः दाखविलें. मराठेशाईचे डफ व एल- फिन्स्टन यासारखे इतिहासकार यांचें म्हणणें असें होतें कीं, मराठ्यांचा उदय सह्याद्रि पर्वतावरील वाळलेल्या गवतांत अकस्मात् उद्भवणाऱ्या वणव्या- प्रमाणे होता. या वणव्याचा ज्याप्रमाणें आधीं कांहीं एक मागमूस नसतो पण तो एकदम पेट घेतो व त्याचा क्षणार्धात जिकडे तिकडे फैलाव होतो व तो वणवा लवकरच विलयास जातो. तीच तन्हा मराठ्यांच्या राजकीय उदयाची आहे. शिवाजीपासून या राजकीय उदयास एकाएकीं प्रारंभ झाला व थोड्याच काळांत मराठेशाईचा सर्व हिंदुस्थानभर विस्तार झाला व थोड्याच काळांत त्याचा विलयही झाला. डफ साहेबांचें हें मत सर्व संमत असें समजलें जात असे. पण रा. माधवरावांनी आपल्या 'मरा- व्यांच्या सत्तेचा उदय' या ऐतिहासिक ग्रंथांत हें मत खोडून काढलें. त्यांनी असे सिद्ध केलें कीं, शिवाजीचा उदय आकास्मिक नव्हता. ज्ञानेश्वरापासून रामदासापर्यंतच्या अडीचशे तीनशे वर्षांच्या काळांत महा- राष्ट्रांत किती तरी साधुसंत व कवि होऊन गेले. त्यांनीं आपल्या ग्रंथांनी व उपदेशानें महाराष्ट्रांतील बहुजनसमाजाची मनोभूमि उत्तम तऱ्हेनें नांगरून तयार केली. अशा उत्तम मशागत केलेल्या मनोभूमींत शिवाजीनें राजकारणाचें बी पेरलें. म्हणूनच त्या बीजाला लवकर अंकूर फुटून त्याचा