पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सज्जनगड व समर्थ रामदास. ९९ 'चरणरज शिवाजी राजे यांनी चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना जे मजवर कृपा करूनु सनाथ केलें आज्ञा केली कीं तुमचा मुख्य धर्म राज्य साधन करुनु धर्म स्थापना देव-ब्राह्मणांची सेवा प्रजेची पीडा दूर करून पाळण रक्षण करावें हें व्रत संपादून त्यांत परमार्थ करावा तुम्हीं जें मनीं घराल तें श्री सिद्धीस पाववील त्याजवरून जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुक लोकांचा नाश करावा विपुल द्रव्य करुनु राज्यपरंपरा अक्षई चा- लेल ऐशीं स्थळे दुर्घट करावी ऐसें जें जें मनीं धरलें तें तें स्वामीनीं आशीर्वादप्रतापें मनोरथ पूर्ण केलें या उपरि राज्य संपादिलें तें चरणीं अर्पण करुनु सर्वकाळ सेवा घडावी ऐसा विचार मनीं आणिला तेव्हां आज्ञा झाली कीं तुम्हांस पूर्वी धर्म सांगितले तेच करावे तीच सेवा होय ऐसें आज्ञापिलें यावरून निकट वास घडुनु वारंवार दर्शन घडावें श्रीची 66 पापना कोठें तरी होऊनु सांप्रदाय शिष्य व भक्ति दिगंत विस्तीर्ण घडावी ऐशी प्रार्थना केली तेही आसमंतात गिरिगव्हरीं वास करुनु चाफळी श्री ची स्थापना करुनु सांप्रदाय शिष्य दिगंत विस्तीर्णता घडली.” हें पत्र सन १६७९ मधलें आहे हे ध्यानांत ठेविले म्हणजे या पत्राचा पुरात्रा प्रथम भेटीच्या प्रश्नासंबंधानें शून्य आहे हें सहज समजेल. कारण शिवाजीसारखा शिष्य रामदासांची भेट केव्हांही झाली असली तरी आप त्याच आशीर्वादाने सर्व झालें असें सौजन्यानें म्हणेल हैं उघड आहे. शिवाजीनें राज्य अर्पण केल्यावर रामदासांनी राज्य करण्याचाच उप- देश केला हा उल्लेखही पुढल्या गोष्टीला लागू आहे. निकटवासाचा उल्लेख परळीकडे स्वाभाविकपणें जातो. कारण चाफळच्या मानानें परळी प्रतापगडास जवळ आहे. पुढल्या वाक्यांत रामदासांनी चाफळीं श्रीची स्थापना करून शिष्य सांप्रदाय वाढविल्याचें विधान आहे. निकट-वासाची विनंति आहे व चाफळबद्दलचें विधान आहे. पण रा. देव यानीं या पत्राचा अर्थ करतांना या दोन वाक्यांत कार्यकारणभावाचा अर्थ लावला आहे. व असा अर्थ लावण्याकरितां पत्रांतील 'तेही' या शब्दाचा 'तेव्हां झणून' असा अर्थ घरला आहे. पण 'तेही' याचा खरा अर्थ 'त्यांनी' असा आहे. व हा खरा अर्थ घेतला म्हणजे निकटवासाची विनंति व