Jump to content

पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. - प्रपंचांतली कामें व्यवस्थित रीतीने करण्याचे ज्ञान प्रत्येक स्त्रीपुरुषास असणे अवश्य आहे ही गोष्ट लक्षात घेऊन याविषयीची माहिती संसार नांवाच्या पुस्तकमालिकेच्या द्वारे मराठी वाचकांना करून देण्याचे योजिलें आहे. या मालेपैकी प्रस्तुत पुस्तक 'घरांतली कामें ' हे पहिले आहे. याचा काही उपयोग होत असल्याचे दिसून आल्यास पुढची पुस्तकेंही लवकरच प्रसिद्ध होतील. त्र्यं. ना. लेले. वा. गो. आपटे.