पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ४ थे. शुद्ध व स्वच्छ रहावी यासाठी सडा घालावयाचा असतो. तुळशीवृंदावन किंवा घराच्या अंगणांत किंवा परसांत असलेले उंबराचें किंवा पिंपळाचे झाड यांच्या भोवतीही सडा घालतात. कारण, तुळशीच्या, उंबराच्या, किंवा पिंपळाच्या पूजेसाठी व त्यांना प्रदक्षिणा घालण्यासाठी बायकांना तेथे नेहमी जावे लागते व प्रदक्षिणेची जागा पायांनी उखळते. यासाठी या झाडाभोंवतींही सडा धालतात. म ३ पहाटेस लोक हिंडूं फिरूं लागण्यापूर्वी सडा घातलेला वाळला पाहिजे. ह्मणून सडा फार लवकर घालावा, ह्मणजे लोकांच्या पायाला ओलं लागणार नाही व शेणाची घाणही येणार नाही. सडा घालण्यासाठी होतां होईल तो सडकें शेण घेऊ नये, ह्मणजे घाण कमी येईल. ४ पावसाळ्यांत, आणि धुके पडले असेल किंवा गारठा फार असेल अशा दिवशी, सडा घालण्यापासून तो घालणाराला व त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्याला दोघांनाही फार त्रास होतो. ह्मणून अशा वेळी सडा न घातला तरी चालेल. पाऊस पडत असला ह्मणजे सडा घालण्याचे काम मेघराज स्वतः करीतच असतात. उन्हाळ्यांत मात्र तो दररोज घालावा. उन्हाळ्यांत संध्याकाळी उघड्या हवेत बसण्यासाठी पलंग, चौरंग, किंवा खाटा वगैरे घालण्यापूर्वी नुसत्या पाण्याचा छिडकाव एक दोन वेळां जरूर करावा. त्याच्या योगाने जमिनीची उष्णता थोडीशी कमी होते. ५ सडा घालण्यापूर्वी अगोदर शेण, माती, ती कालविण्याचे भांडे व दुसरें एक पाण्याचे भांडे ही घ्यावी. पदर घट्ट बांधावा. दोन्ही हात चांगले मोकळे करावे. थंडीकरितां अंगांत बंडी वगैरे घातली