पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १ वें. ९५ सतरंजी लवकर मळलेली दिसते. सतरंजी वारंवार धुतां येत नाही, यासाठी मळक्या अस्मानी वगैरे रंगांची सतरंजी घेणे चांगले. सतरंजीचा चांगुलपणा ह्मणजे ती नव्या कापसाच्या सुताची, पक्क्या रंगाची, आणि खळ न दिलेली असावी. फार जाड असू नये. साधारण पातळ पण घट्ट विणीची असावी. इतकी की, ती नवी असतां भुईला टेकून आडवी धरली, तर ती ताठ भिंतीसारखी उभी रहावी, आणि तिच्यावर पाण्याचे थेंब टाकले, तर ते खाली गळू नयेत किंवा त्याने तिचा रंग पसरूं नये. ___ चांगली सतरंजी काळजीपूर्वक वापरल्यास १५ वर्षे तरी खुशाल टिकते. बाजारच्या सतरंज्यांपेक्षा कित्येक तुरुंगांतून तयार होणाऱ्या सतरंज्या विशेष बळकट व टिकाऊ असतात. कित्येक सतरंज्या मोठमोठ्या दालनांत बिछाइतीसाठी मोठ्या लांबरुंद काढलेल्या असतात. त्यांस हिंदुस्थानी भाषेत फर्श ह्मणतात. या रोज उचलण्यासवरण्यासारख्या नसल्यामुळे, बिछान्याच्या उपयोगी पडत नाहीत. गादी-निजलेल्या माणसाच्या · अंगाला खालून ऊब राहावी व बिछान्याला मऊपणा यावा, यासाठी गादीची योजना आहे. गादीला कापड पूर्वी खारव्याचे घालीत, अलीकडे जिनासारखें, जाड, व त-हेत-हेच्या रंगांचे कापड निघाले आहे. श्रीमंत लोकांच्या गाद्या साटीण, मश्रु, किनखाब, यांसारख्या कापडाच्या करतात. कोणत्याही कापडाची गादी केलेली असली, तरी गादीत पुढील गुण ह्मणजे नरमपणा व ऊबदारपणा हे असावे, आणि मळकेपणा किंवा कापूस चिकटण्याचा धर्म हे नसावेत.