Jump to content

पान:संप्रदाय-सुरतरू भाग २ रा.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८८ श्रीमत्त श्रीनारायण प्रसन्न प्रस्तावना एकः शब्दः सम्यग्ज्ञातः स्वर्गे लोके कामधुक् भवति || " मस्साधुवर्य गुलाबराव महाराज या अलौकिक विभूतीनें आधुनिक चिकित्सक व संशयात्म्या जनतेस, आपल्या सर्वश्रेष्ठ विभूतिमत्वानें चकित करून सोडलें यांत शंका नाही. चातुर्वर्ण्याच्या आधुनिक समजाप्रमाणे, वेदानधिकारी अशा वर्णांत जन्म, बालांघता, शिक्षणाचा म्हणजे प्राथमिक शिक्षणाचाही अभाव, खेड्यांतील राहणी या सर्व बाबींचा, श्रीगुलाबराव- महाराजांच्या हयातीतील त्यांच्या सर्वगामी बुद्धिमत्तेच्या व सर्वशास्त्रप्रवीण- तेच्या अनेक घडलेल्या गोष्टींचा आणि त्यांनीं गद्यपद्यात्मक अशा रचून व उपदेशून तयार केलेल्या अनेक सद्रश्नग्रंथांचा व त्यांतील सर्वशास्त्रावगाही विषयविवेचनपद्धतीचा विचार केल्यावरच त्यांचे अलौकिक विभूतिमत्व प्रत्ययास येते व बुद्धीस पटते; आणि मग सहज, अवतरणांत उद्धृत केलेलें वाक्य श्रद्धापूर्वक उच्चारिलें वा लिहिलें जातें. • पराविद्या व अपराविद्या असा आपल्याकडे भेद केला असून परा विद्या म्हणजे ब्रह्मविद्या ही सर्व विद्यांहून, सर्व लौकिक विद्यांहून श्रेष्ठ आहे, इतकेंच . नव्हे तर सर्व अपरा विद्यांचे ज्ञान एका परा विद्येच्या ज्ञानांत समाविष्ट होतें असेही मानिले आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजेच श्रीमत् साधुवर्य गुलाबराव महाराज हे होत, यांत शंका नाहीं. श्रीमन्महाराजांनी एका परां विद्येचा आश्रय केला, एका शब्दाचा- ब्रह्मशब्दाचा तन्मयता संपादिली; आणि त्यांना तो शब्द स्वर्ग, अभ्यास केला. त्याच्यांत मोक्ष आणि लोक ह्यां- विषय कामधुक् सर्व वासनांच्या वासनाक्षयांत, सर्व वासनांच्या कामाचा दोहणारा - पुरविणारा झाला असें सष्ट दिसून येत आहे. परब्रह्मस्वरूप एक