पान:संतवचनामृत.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१३] गुरूची आवश्यकता. २३ झाडूनि आणिकी नेला तयां फुकटाच वेधु । तैसी परी होईल तुज उपदेशे आनंदु ॥ सत्व हे रजतम तुज लाविती चाळा। काम क्रोध मद मत्सर तुज गोविती खेळा। या सवे झणे जासी सुकुमार रे बाळा । अपभ्रंशी घालितील मुकशील सर्वस्वाला ॥ कोसलियोंने घर सुदृढ 4 केलें। निर्गमु न विचारितां तेणे सुख मानिले। जाले रे तुज तैसें यातायाती भोगविलें। मोक्षद्वार चुकलासि दृढ कर्म जोडिले ॥ सर्पे मैं दर्दुर धरियेला रे मुखीं। तेणेहि रे माशी धरियेली पक्षीं । तैसा नव्हे ज्ञानयोगु आप आपणां भक्षी । इंद्रियां घाली पाणी संसारी होई रे सखी॥ पक्षिया पक्षिणी रे निरंजनी ये वनीं। पिलिया कारणे रे गेली चाराया दोन्हीं। मोहोजाळे गुंतली रे प्राण दिधले टाकुनि । संसार दुर्घट हा विचारु पाहे परतुनी ॥ जाणत्या उपदेशु नेणे तो भ्रांति पडिला । तैसा नव्हे शानप्रकाशु ज्ञानदेवो अनुवादला। अनुभवी गुरुपुत्र तोचि स्वये बुझाला। ऐके त्या उद्धरणा गायक सहज उद्धरला॥ १चुकून. २ कोळी. ३ बाहेर येण्याचे द्वार. ४ बेडुक.५ समजला.