पान:संतवचनामृत.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ १२ .गुरूची आवश्यकता. तवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजेंवीण हित कोण सांगे ॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥ ११. " आहे तें वर्म वेगळोंचे." कां सांडिसी गृहाश्रम । कां सांडिसी क्रियाकर्म । कासया सांडिसी कुळींचे धर्म । आहे ते वर्म वेगळेचि ॥ भस्म उधळण जटाभारु । अथवा उदासी दिगंबरु।। न धरी लोकांचा आधारु । आहे तो विचार वेगळाचि ॥ जप तप अनुष्ठान । क्रियाकर्म यज्ञदान । कासया इंद्रियां बंधन । आहे ते निधान वेगळेचि ॥ वेदशास्त्र जाणितलें । आगमी पूर्ण ज्ञान जालें। पुराणमात्र धांडोळिलें । आहे ते राहिले वेगळेचि ॥ शब्दब्रह्मे होसी आगळा । म्हणसी न भिये कळिकाळा । बोधेवीण सुखसोहळा । आहे तो जिह्वाळा वेगळाचि ॥ याकारणे श्रीगुरुनाथु । जंव मस्तकी न ठेवीं हातु । निवृत्तिदास असे विनवितु । तंव निवांतु कवि होय ॥ १२. गुरु हा संतकुळींचा राजा आहे. गुरु हा संतकुळींचा राजा । गुरु हा प्राणविसांवा माझा । गुरुवीण देव दुजा । पाहतां नाहीं त्रैलोकीं ॥ गुरु हा सुखाचा सागर । गुरु हा प्रेमाचा आगरु । गुरु हा धैर्याचा डोंगरु । कदाकाळी डळमळीना ॥ गुरु हा वैराग्याचे मूळ । गुरु हा परब्रह्म केवळ । गुरु हा सोडवी तात्काळ । गांठ लिंगदेहाची ॥ १ गुह्य. २ अनुभव. ३ गोष्ट. ४ भस्म लावणे. ५ नन. ६ शास्त्र. ७ वेद.