पान:संतवचनामृत.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत. भरल्याने आतां पूर्वपश्चिमभाव राहिला नाही, व देवावांचून कोठे रिता ठावही उरला नाही ( क्र. १४९ ). उत्तमभूमि शोधून हे मी गुरुवचनबजि पेरिलें आहे; प्रेमाचें पीक ज्या वेळी येईल त्या वेळी तें सांठविण्यास गगनहीं पुरणार नाही; चार वेद व सहा शास्त्रे यांनी माप घातले, तरी देव अद्याप अमेयरूपच राहिला आहे; अंतःकरणांतल्या निकट भावावांचन देहांत पिकलेल्या देवाचें माप घेणे अशक्य आहे असें एकनाथ म्हणतात (क. १५०). २७. या ग्रंथाचे कामी प्रो. कृष्णाजी वेकटेश गजद्रगडकर, प्रो. शंकर वामन दांडेकर, रा. सा. वासुदेवराव दामले, रा.शंकर केशव धर्माधिकारी, व रा. जगन्नाथ रघुनाथ लेले या सर्वांची निरनिराळ्या प्रकारची जी मदत झाली आहे तिजबद्दल मी त्या सर्वांचा फार आभारी आहे. गणेश प्रिंटिंग वर्क्सच्या मालकांनी व आर्यभूषण छापखान्याच्या मालकांनी फार मेहनतीने व काळजीपूर्वक हे पुस्तक छापून दिलें त्याबद्दल मी त्यांचाही फार आभारी आहे. रा. द. रानडे.