पान:संतवचनामृत.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१०२] देव आणि भक्त. . २०३ योगियासी भेटी नाहीं। तो आवडीने कवळी बाहीं॥ एकाजनार्दनीं भोळा । भक्तां आलिंगी सांवळा॥ १००. भक्तपणा लहान नाही; भक्ताचे पाय देव हृदयांत बाळगितो. भक्तपणा साने नव्हे रे भाई। भक्ताचे पाय देवाचे हृदयीं। भक्त तोचि देव, भक्त तोचि देव । जाणती हा भाव अनुभवी।। दान सर्वस्वं उदार बळी । त्याचे द्वार राखे सदा वनमाळी ॥ एकाजनार्दनी मिती नाही भावा। देवचि करितोभक्ताची सेवा ॥ . १.१. कृष्णाची निंदा करून, व नारदाचा सन्मान करून कंस सायुज्यास गेला. संतांसी जो निंदी देवासी जो वंदी। तो नर आपदी आपदा पावे॥ देवासी जो निंदी संतांसी जो वंदीं। तो नर गोविंदी सरता होय ॥ कृष्णा कंस द्वेषी नारदा सन्मानी । सायुज्यसदनी पदवी पावे ॥... एकाजनार्दनीं गुज सांगें कानी । रहा अनुदिनीं संतसंगे॥ १०२. संताचा महिमा देवासच माहित, देवाची गोडी सतासच माहित. संतांचा महिमा देवचि जाणे । देवाची गोडी संतांसी पुसणे॥ ऐसी आवडी एकमेकां । परस्पर नोहे सुटिका ।। बहुत रंग उदक एक । यापरि देव संत दोन्ही देख ॥ संतांविण देवा न कंठे घडी । उभयतां गोडी एक असे ॥ मागे पुढे न हो कोण्ही । शरण एका जनार्दनीं ॥ १ लहान. २ गणना. ३ दुःख. ४ घटिका.