पान:संतवचनामृत.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८८ संतवचनामृत: एकनाथ. ६५३ ५३. योगसाधनाने जो सांपडत नाही तो आज कीर्तनांत नाचत आहे. आजि नवल झाले वो माय । पाहण्या पाहणे दृष्टि धाये ॥ ऐसा लाघवी सुखकर मूर्ति । संतसंगें जाली मज विश्रांति ॥ योगीश्वर जया चिंतिती। सनकादिक जया ध्याती ॥ योगसाधने नातुडे जो माये । एकाजनार्दनी कीर्तनी नाचतु आहे॥ ५४. कीर्तनाने चराचर पावन होतें. मागणे ते आम्ही मागू देवा । देई हेवा कीर्तनीं ॥ दुजा हेत नाहीं मनीं । कीर्तनावांचुनी तुमचीया ॥ प्रेमें हरिदास नाचत । कीर्तन होत गजरौं । एकाजनार्दनी कीर्तन । पावन होती चराचर जाण ॥ ५५. कामनिक कीर्तन केले असतां जन्मोजन्मीं पतनास कारण होईल. करुनी कीर्तन मागती जे द्रव्य । ते जाणावे वैधव्य विधवेचें ॥ सर्व अलंकार शरीर शोभले । वायांपरी गेले कुंकूहीन ॥ मानवाने भावे करावे कीर्तन । आनंदें नर्तन वैष्णवांपुढे ॥ एकाजनार्दनी कामनिकै कीर्तन । करितां पतन जन्मोजन्मीं ॥ ५६, कोणास काही सांकडे न घालितां कीर्तन करावें. कीर्तनाची मर्यादा कैसी। देव सांगे उद्धवासी ॥ गावे नाचावे सांबडे। न घालावे को. त्या कांहीं ॥ १ तृप्त होणे. २ सांपडत नाही. ३ आवडी, छंद. ४ हेतु. ५ मनांत इच्छा . न, सकाम, ६ भोळेपणाने, प्रेमळपणानें: ७ संकट.