पान:संतवचनामृत.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८६ संतवचनामृत: एकनाथ. [६४७ ४७. भक्ति ही माता असून मुक्ति ही तिची दुहिता आहे. भक्तीच्या पोटा मुक्ति 4 आली। भक्तीने मुक्ती वाढावलें ॥ भक्ति ते माता मुक्ति ते दुहितां । जाणोनि तत्त्वतां भजन करी॥ भक्ति सोडोनि मुक्ति वांछिती वेडी। गूळ सोडोनि कैसी ये गोडी। संतोषोनि भक्ति ज्यासी दे मुक्ति। तोचि लाभे येर व्यर्थ कां शिणती॥ एकाजनार्दनीं एक भाव खरा। भक्ति मुक्ति दानी आलिया घरा॥ ४८. प्रेमावांचून ज्ञानी शृंगारलेल्या रांडेप्रमाणे दिसतो. भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजी ॥ प्रेमसुख देई प्रेमसुख देई । प्रेमेविण नाहीं समाधान ॥ रौडिवेने जेविं गंगारु केला । प्रेमेविण जाला शानी तैसा ॥ एकाजनार्दनीं प्रेम अति गोड । अनुभवी सुरवाड जाणतील ॥ __ ४९. भक्ति हे मूळ, वैराग्य हे फूल, व ज्ञान हे फळ होय. भक्तीचे उदरीं जन्मले शान । भक्तीने ज्ञानासी दिधले महिमान ॥ भक्ति ते मूळ ज्ञान ते फळ । वैराग्य केवळ तेथींचे फूल ॥ फूल फळ दोनी येरयेरां पाठीं। शान वैराग्य तेविं भक्तीचे पोटीं । भक्तीविण ज्ञान गिवर्सिती वेडे । मूळ नाही तेथे फळ केवि जोडे । भक्तियुक्त ज्ञान तेथे नाहीं पतन । भक्ति माता तया करितसेजतन॥ शुद्ध भाक्तिभाव तेथे तिष्ठे देव। ज्ञानासी तो ठाव सुखवस्तीसी॥ शुद्धभाव तेथे भक्तियुक्त ज्ञान । तयाचेनि अंगें समाधि समाधान ॥ एकाजनार्दनी शुद्ध भाक्ति क्रिया। ब्रह्मज्ञान त्याच्या लागतसे पायां। १ मुलगी. २ आपण होऊन. ३ विधवा, वेश्या. ४ सुख. ५ शोधणे.