पान:संतवचनामृत.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ संतवचनामृत : सेनान्हावी. ४. गिरिकाननास जाल तर विभांडकाप्रमाणे रंभेकडून नागवून घ्याल. कशासाठी करितां खटपट । तप तीर्थ व्रतें अचाट ॥ नलगे शोधावें गिरिकानन । भावे रिघा विठ्ठला शरण ॥ विभांडक शृंगी तपस्वी आगळा । क्षण न लागता रभेन नागविला॥ जाणोनि सेना निवांत बैसला । केशवराजा शरण रिघाला ॥ ५. सेना पापाचा पुतळा असला तरी तूं उदाराचा राणा आहेस. अन्यायी अन्यायी । किती म्हणोनि सांगों काई ॥ तूं तो उदाराचा राणा । क्षमा करी नारायणा ॥ काम क्रोध लोभ मोहो । नाडिला यांचनि पहाहो॥ नावडे संतसंगति । नाहीं केली हरिभक्ति ॥ . निंदा केली भाविकांची। चित्ती आस धनाची ॥ सेना पापाचा पुतळा । तुज शरण जो दयाळा ॥ ६. माझ्या मनांत जोभाव मी धरला आहे तो तूं सिद्धीस ने. आतां ऐसे करी गा देवा । तुझी घडो पायसेवा॥ मनामाजीं दुर्बुद्धि । न यावी माउलिये कधी ॥ चित्ती भाव जो धरिला । सिद्धि न्यावा जी विठ्ठला ॥ सेना ह्मणे याविण कांहीं । लाभ दुसरा नाहीं॥ ७. तुमचे पाऊल देखिले या माझ्या भाग्यास आज - सीमाच नाही. धन्य धन्य दिन । तुमचे झाले दरुषण । आजि भाग्य उदया आले । तुमचे पाऊल देखिले ॥ १ पर्वतांतील अरण्य. २ श्रेष्ठ. ३ फसवणे. ४ हेतु, इच्छा.