पान:संतवचनामृत.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६.११४] _ संतमहिमाः ११७ माती आणि सोने ज्या भासे समान। तो एक निधान योगिराज ॥ नामा म्हणे ऐसे भक्त जे असती। तेणे पावन होती लोक तीन्ही॥ ११२. संताच्या संगतीने अधमासही काळांतरीं गति मिळेल. कडु वृंदावन साखर घोळिलें । तरी काय गेले कडूपण ॥ तैसा तो अधम करो तीर्थाटण । नोहे त्याचे मन निर्मळत्व ॥ बचनाग रवा दुग्धी शिजविला । तरी काय गेला त्याचा गुण ॥ नामा म्हणे संतसज्जनसंगतीं । ऐशासही गती काळांतरीं ॥ . ११३. संतांचे चरण देखिल्यास कल्पकोटी पापराशि दग्ध होतील. संताचे लक्षण ओळखावया खूण । जो दिसे उदासीन देहभावा॥ सतत अंतरी प्रेमाचा जिव्हाळा । वाचे वसे चाळा रामकृष्ण ॥ त्या संताचे चरण देखिले म्या दृष्टीं। जळती कल्पकोटी पापराशी॥ जयांच्या हृदयी प्रेमाचा जिव्हाळा जीवेभावेगोपाळा न विसंबती॥ त्यांचे अंगणींचा होईन सांडोवा । मग तूं केशवा नुपेक्षिसी ॥ तुझ्या ध्यानी ज्यांचं सदा भरले मनाविश्व तूंचि म्हणोन भजतीभावे त्यांच्या उष्टावळीचा होईन मागता । तरीच पंढरीनाथा भेटी देसी॥ ऐसे नित्यानंद बोधे जे निवाले। ते जिवावेगळे न करी नाम्या ॥ ११४. दुराचारी असला तरी तो संतकृपेनें लवकर उद्धरतो. ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरले । उद्धरावया आले दीन जनां ॥ ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी । नाम घेतां वदनी दोष जाती॥ हो कां दुराचारी विषयी आसक्त । संतकृपे त्वरित उद्धरतो ॥ अखंडित नामा त्यांची वास पाहे । निशिदिनी ध्याये सत्संगती॥ १ ओलावा. २ पाण्याचा पाट, ओवाळन टाकलेला पदार्थ, ३ चरणतीर्थ.