पान:संतवचनामृत.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ ८९ उपदेश. १०७ पोट माझा बंधु पोट माझी बहीण । पोटाने हे दैन्य मांडिलेसे॥ विष्णुदास नामा पोटाकडे पाहे । अझून किती ठाये हिंडविसी ॥ ८८. संगतीचा परिणाम.. बहुरूप्या ब्राह्मणा पडियेलें मैत्र । दोहींचे ते गोत्र एक झाले ॥ वेश्या पतिव्रते पडियला शेजार । दोहींचा आचार एक झाला॥ संग तोचि बाधी संग तोचि बाधी। कुसंग तो बाधी नारायणा॥ नामा विष्णुदासा सत्संगती बोधिला। आत्मा हालाधला पांडुरंग॥ ८९. प्रारब्धाचे सामर्थ्य. कृष्ण सहाय पांडवांसी । ते भोगिती नष्टचर्यासी। साह्य केले हरिहरासी । प्रारब्ध कोणासी टळेना ॥ ऐसी प्रारब्धाची ठेव । झाले भिक्षुक पांडव । राज्य घोडे भाग्य सर्व । सांडियेला ठाव प्रारब्धं ॥ शरीर संचिता आधीन । धर्मराज हिंडे वन । कम बुडाला रावण । आणि दुर्योधन प्रारब्धे ॥ अभिमाने शिशुपाळ । कृष्णहस्ते झाला काळ । यादव निमाले सकळ । केले निर्मूळ प्रारब्धे । कर्मरेखा टळेना । बाण लागला जगज्जीवना। कृष्णे सांडिल्या गोपांगना । हे नारायणा प्रारब्ध ॥ कामबुद्धीचे सुख । अति मानिती ते मूर्ख । चंद्रासी लागला कलंक । इंद्रासी दुःख प्रारब्धं ॥ हरिश्चंद्र तारामती । घोर जन्मांतर भोगिती। १ ठिकाण. २ दुर्दैव.