पान:संतवचनामृत.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ संतवचनामृत : नामदेव. [६९ दगडाचा देव इच्छा पुरवित । तरी कां भंगत आघाताने ॥ पाषाण देवाची करिती जे भक्ति । सर्वस्वा मुकती मूढपणे॥ प्रस्तराचा देव बोलत भक्तांते । सांगते ऐकते मूर्ख दोघे ॥ ... ऐशांचे महात्म्य जे कां वर्णिताती । आणि म्हणविती तेणे भक्त ॥ परंतु ते नर पामर जाणावे । त्यांचे नायकावे बोल कानीं ॥ धोंडा घेडोनियां देव त्याचा केला । आदर पूजिला वर्षे बहु ॥ तरी तो उतराई होय केव्हां काई । बरवे हृदयीं विचारा है। , घोडापाण्याविण नाहीं देव कोठे। होतां सानमोठे तीर्थ क्षेत्र ॥ द्वादशीचे गांवीं जाहला उपदेश । देवावीण ओस स्थळ नाहीं॥ तो देव नामया हृदयीं दाविला । खेचराने केला उपकारु हा ॥ १०. विसोबा खेचराने डोळियाचा डोळा उघडला. सद्गुरुसारिखा सोइरा जिवलग । तोडिला उद्वेग संसारींचा। काय उतराई होऊ कवण्या गुणे । जन्मा नाहीं येणें ऐसे केले ॥ माझे सुख मज दाखविले डोळा । दिधली प्रेमकळा नाममुद्रा । डोळियाचा डोळा उघडिला जेणे । लेवविले लेणे आनंदाचें ॥ नामा म्हणे निर्की सांपडली सोय । न विसबै पाय खेचराचे ॥ १ दगड. २ ठोकून तयार करणे. ३ बार्शी ? ४ दुःख. ५ दागिना. ६ चांगली, खरोखर. ७ मार्ग. ८ विसरणे.