पान:संतवचनामृत.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुक्ताबाई. १. मुक्ताबाईचा अनुभव. १. मी अंध वायां जात असतां निवृत्तिराजाने मजला सावध केलें. ऊर्णाचियां गळां बांधिली दोरी । पाहो जाय धरी तंव तंतु नाहीं। तैसें जाले बाई जंव एकतत्त्व नाहीं। दुजी जंव सोई तंव है अंध॥ ऐसी मी हो अंध जात होते वायां । प्रकृति सार्वया पावली तेथे ॥ मुक्ताई सावध करी निवृत्तिराज । हरिप्रेमें उमंज एकतत्त्वे ॥ २. निवृत्तीच्या तटाकाने आम्ही मूळच्या स्थानास जाऊन प्रपंचाशी अबोला धरिला. प्रारब्ध संचित आचरण गोमटें। निवृत्तितटाके निघालोआम्ही ॥ मुळींचा पदार्थ मुळीच मैं गेला । परतोनि अबोला संसारासी ॥ सत्यमिथ्याभाव सत्वर फळला । हृदयीं सामावला हरिराज ॥ अव्यक्त आकार साकार हे स्फूर्ति । जिवेशिवें प्राप्ति ऐसे केले ॥ सकाम निष्काम वृत्तीचा निजफेर । वैकुंठाकार दाखविले ॥ मुक्तलगं मुक्त मुक्ताईचे तट । अवघेचि वैकुंठ निघोटॅ रया ॥ ३. नामस्मरणामुळे देव निजानंदवैकुंठ उघडे करितों. नाममंत्रे हरि निजदासां पावे । ऐकोनियां धांवे झडकरी ॥ सुदर्शन करी पावे लवकरी। पांडवां साहाकारी श्रीकृष्ण रया। १ ऊर्णनाभि, कोळी, २ कृपा. ३ मदतीला. ४ समज. ५ भरणे, मावणे. ६ मुक्तीच्या जवळचें. ७ संपूर्ण. ८ साह्यकारी.