स्पष्टपणें आपल्या स्मृतिद्वारा केलेला दिसतो. ब्रह्मचर्य हैं बल व बुद्धि
देणारें असून आयुष्याची वृद्धि करणारें आहे अशी स्मृतिकारांची
खात्री होती. म्हणूनच आयुष्याचा पहिला भाग ब्रह्मचर्यपरिपालनांत
घालवावा अशी त्यांची आज्ञा आहे. गृहस्थादि पुढचे आश्रम ऐच्छिक
आहेत. पण ब्रह्मचर्याश्रम तसा ऐच्छिक नाहीं. तो केल्याशिवाय
पुढील आश्रम स्वीकारतांच येत नाहींत अशी आमचीं शास्त्रें स्पष्ट-
पणें सांगतात. शरीरसामर्थ्य, ज्ञान, आयुष्य आणि ओज हीं सर्व
वीर्यवृद्धीनेंच वाढतात, आणि वीर्यवृद्धि ब्रह्मचर्यावांचून होत नाहीं,
- या कारणानें ब्रह्मचर्याची प्रशंसाच छांदोग्यादि उपनिषदांत व मनु,
याज्ञवल्क्य इत्यादि स्मृतींत सांपडते. विवाहापूर्वी मनुष्यानें ब्रह्मचारी
राहिलें पाहिजे, इतकेंच नव्हे तर विवाहानंतरही ब्रह्मचर्यव्रताचे आचरण
शक्य व आवश्यक आहे असें स्मृतिकारांचे मत होतें. याचें उदाहरण
म्हणून पुढील दोन अवतरणें पुरेशी होतील :-
षोडशर्तु निशः स्त्रीणां तासां युग्मासु संविशेत् ।
ब्रह्मचार्येव पर्वाण्याद्याचतस्रश्च वर्जयेत् ॥
— याज्ञ०, अ. १ श्लो. ७९
अमावास्यामष्टमीं च पौर्णिमासी चतुर्दशीम् ।
ब्रह्मचारी भवेन्नित्यमप्यृतौ स्नातको द्विजः ॥
— मनु, अ. ४।१२८
यावरून विवाहित स्त्री-पुरुषांनी ब्रह्मचर्यव्रताने राहिलें पाहिजे असें
स्मृतिकारांस वाटत होते, व केवळ प्रजोत्पादनापुरताच स्त्रीसंभोग
करणारा गृहस्थ ब्रह्मचारी या पदवीलाच पात्र असून तो पूर्णायु
होतो असें त्यांचे लोकांना आश्वासन होतें वगैरे गोष्टी स्पष्ट दिसून येतात.
अल्पप्रसवितेचें साध्य अल्पसंभोगानें साधण्यासारखें आहे अशी
आपल्यापैकीही पुष्कळांची समजूत आहे. या ठिकाणीं आम्हांस एक