सुप्रजाजननाच्या दृष्टीनें संततिनियमनाचें धोरण विवाहित स्त्री-
पुरुषांनीं स्वीकारलें पाहिजे इतकें ठरलें. पण याच्या पुढे दुसरा एक
प्रश्न उपस्थित होतो तो हा कीं, अल्पप्रसविता साध्य कशी करा -
वयाची ? साध्य कबूल केलें कीं पुढे साधनांचा विचार केलाच पाहिजे.
देशांत सुप्रजा निर्माण व्हावी व देशाचे आरोग्य, तेज व बुद्धिबल
हीं वाढावीत यासाठीं अल्पप्रसवितेचें ध्येय पतिपत्नींनी मान्य
करावें हें खरें. पण नुसत्या ध्येयाची व्याख्या करून काम भागण्या-
सारखें नाहीं. हें ध्येय साध्य करण्यासाठी श्रेयस्कर मार्ग कोणता
त्याचाही विचार करणें अगत्याचें आहे.
या बाबतीत अगदीं प्रथम सुचणारी उघड अशी विचारसरणी
ही, कीं अल्पप्रसविता साध्य करण्यासाठी प्रजेचें मूळ उगमस्थान जें
संभोग सौख्य त्याचा उपभोगच स्त्री-पुरुषांनीं नियमितपणे घ्यावा.
कार्याचें नियमन करावयाचें असल्यास त्याच्या कारणाचेंच प्रथम
नियमन केले पाहिजे असें म्हणणें कोणाच्याही विवेचक बुद्धीला
पटण्यासारखें आहे, व संततिनियमनासाठीं संभोगनियमनाचा मार्ग
कोणी सुचविला तर तें उचितच होय. किंबहुना संततिनियमनाचे
अगत्य ज्यांना प्रथम पटले त्यांना देखील त्या ध्येयाच्या साध्यते-
साठीं संभोगनियमन हेंच साधन सुचलें व त्याचाच पुरस्कार त्यांनी
त्या वेळी केला. मालथसच्या सिद्धान्ताची हकीगत मार्गे एके ठिकाणीं
आम्ही दिली त्या वेळींच आम्ही वाचकांस सांगितलें, कीं लोक-
संख्येची वाढ भूमितिश्रेढीनें होते व उपजीविकेच्या द्रव्यांची वाढ
गणितश्रेढीनें होते असा निसर्गनियम असल्याचें सिद्ध करूनच केवळ
पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/४५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण चवथें
संततिनियमनासाठीं ब्रह्मचर्य