पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रत्यक्ष पुरावा व आक्षेप निरसन

२९

जोराने सुरू केलें असेल त्याची कल्पना वाचक सहज करूं शकतील. या प्रचाराच्या कामांत 'ज्ञानफलें' ( Fruits of Philo- sophy) नांवाचें एक चोपडें विकण्याचा त्यांनीं सत्याग्रह केला. सरकारनें हें चोपडें जप्त करण्याचें ठरवून त्याबद्दल न्याय- कोटीत बेझंटवाई व त्यांचे सहकारी ब्रेडलॉसाहेब यांच्यावर खटला सुरू केला. हा खटला १८७६ साली झाला. पण या खटल्यानें संततिनियमनाच्या कार्याची पिछेहाट होण्याऐवजी सर्व देशाचे लक्ष त्या विषयाकडे वळलें. इतकेंच नव्हे तर बेझंटबाईंचा उपदेश लोकांना पटल्यामुळे त्यांनी संततिनियमनाचा पुरस्कार आपल्या प्रत्यक्ष आचरणाने सुरू केला ! कायद्याच्या आधारानें सत्य दासळण्या- ऐवजी अधिक बलिष्ठ होतें म्हणतात तें हें असें ! असो.
 १८७६ सालानंतर जन्मप्रमाणाची कमान इंग्लंडमध्यें सारखी कां उतरत गेली त्याचा हा खुलासा झाला. पण आपल्याला पहा- वयाचा तो मुख्य मुद्दा याहून वेगळाच आहे. १८७६ सालापर्यंत इंग्लंडमध्ये मृत्युप्रमाण कमीअधिक होत होतें, पण तें सारखें कमी होत जाईल अशी चिन्हें मुळींच दिसत नव्हती. उलट, त्यानंतर तें अगदी सारखे कमी होत गेलेलें स्पष्ट दिसतें. आणि याचा एक मोठा सुपरिणाम झाला आहे तो हा, की १९१६ सालचें जन्मप्रमाण- जरी २४ इतके कमी आहे तरी त्यांतून मृत्युप्रमाणाचा १३ हा आंकडा वजा देतां ११ ही जी लोकसंख्येची निवळ वाढ दिसून येते, ती ज्या सालीं जन्मप्रमाण ३३ च्याही वर होतें त्या १८५३ सालच्या वाढीहून अधिक आहे. त्याचप्रमाणे अर्भक मृत्युसंख्येचें प्रमाण १८७६ च्या सुमारास सुमारे १५ होतें तेंही आतां १० पर्यंत खाली आलेलें आहे, असें रजिस्ट्रार जनरलच्या रिपोर्टावरून दिसतें. सारांश, संततिनियमनाचें धोरण स्वीकारल्यामुळे इंग्लंडचें हितच झालेले आहे.