पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
संतति-नियमन

करण्याची शक्ति आपल्या देशांत उरली आहे काय ? या सर्व प्रश्नांस कोणीही सूज्ञ माणूस नकारात्मकच उत्तर देईल. 1 कारण, कोरडे आणि ओले दुष्काळ, धान्याची टंचाई, वस्त्रप्रावरणाची महागाई, आणि द्रव्याचा तर जवळ जवळ अभावच - हेंच आपल्या देशाच्या आजच्या स्थितीचें सगळ्यांत सार्थ वर्णन होईल हें आपल्यापैकीं प्रत्येकाला स्वानुभवानें आणि थोड्याशा अवलोकनानें पटलेले आहे. आपल्या देशांत उत्पन्न होणारें धनधान्य परकी अमलामुळे परदेशांत रवाना होतें त्यामुळे आपल्या देशांतील प्रजेला पोटभर खावयास मिळत नाहीं असें एखाद्यास वाटण्याचा संभव आहे. पुष्कळ विचार- वंत लोक ब्रिटिशराज्याची सदोषता दाखवितांना या प्रकारची विचार- सरणी पुढे मांडतात. परंतु, या विचारसरणीत सत्याचा थोडासा अंश असला, आणि राजकीय चळवळ करणाऱ्यांना तिचें हत्यार उपयोगी पडण्यासारखे असले तरी ती सर्वस्वी ग्राह्य नाहीं.कारण परकी राज्य जाऊन हिंदुस्थानांत स्वराज्य किंवा सुराज्य स्थापन झालें आणि देशांतील धनधान्य परदेशीं न जातां येथील लोकांच्या उप- योगासाठी येथेंच रहावें अशी व्यवस्था झाली, तरी देखील तें एक- तीस कोटी व त्याहीपेक्षां अधिक वाढत जाणाऱ्या लोकसंख्येच्या सुखासमाधानाला पुरेसें होईल असें समजतां येणार नाहीं. मालथस नांवाच्या गृहस्थाने तर अठराव्या शतकांत लोकांना सिद्ध करून दाखविलें कीं, आजपर्यंतच्या मनुष्यजातीच्या इतिहासावरून असें दिसतें, की कोणत्याही देशाची लोकसंख्या नेहमीं दुप्पट, चौपट, सोळापट अशा प्रमाणांत वाढत जात असून त्या देशाच्या निसर्गो- त्पादित द्र्व्यांचा सांठा मात्र दुप्पट, चौपट, आठपट अशा प्रमाणांत वाढत जातो; आणि या सिद्धांताचा इशारा देऊन त्यानें अखिल मानवजातीला उद्देशून लोकसंख्येची वाढ कमी करण्याविषयीं कंठ- रवानें उपदेश केला. मालथसच्या या सिद्धान्ताविषयीं आणि जन्म-