पान:संगीत शारदा.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

5 अंक १ला- १३ 0-

भद्रे-पाहतों-पण--

भुजंग०–'पण' कशाला हा मध्ये शंभरदां ! आतां कुठे आडते आहे तें स्पष्ट सांगानात?

भन्ने १०-माझं काय, स्पष्ट सांगतो. द्रव्यांत !

भुजंग -अहो पण, लागेल तितकं द्रव्य देतो, असं मी मघाशींच तुम्हांला सांगितलं.

भद्रे०-आणि ते मी ऐकलं. तशीच दुसरी गोष्ट या संगमपूरच्या आसपास कांहीं तुम्हांला मुलगी मिळायची नाही. कारण खोटेच का होईना, पण तुम्ही हे दांत बांधून घेतले आहेत, त्यामुळे म्हणा किंवा दुसऱ्या काही कारणानं म्हणा, तुमच्या म्हातारपणासंबंधानं बोभाटा फार झालेला आहे. यासाठी दूर एखाद्या ठिकाणी जावं लागेल. समजा, शंभर कोसांवर जावं लागेल. कबूल ?

भुजंग०-अहो, कबूल म्हणून काय विचारता ! प्रयाग, काशीपलीकड़े सुद्धां जायला आम्ही तयार आहों. -बरं, तुम्हांला बायको कशी मिळाली पाहिजे ? म्हणजे रूपानं, वयानं- भुजंग०-(उत्सुकतेने) खरं सांगू ? अगदी माझ्या मनाप्रमाणं पाहून देणार असाल, तर सांगतो. -अगदी तुमच्या मनाप्रमाणं पाहून देतो. सांगा, कशी पाहिजे ? भुजंग०--अशी पाहिजे- पद्य-('मंदस्मित अरविंद ' या चालीवर.) सुंदर खाशी सुबक ठेंगणी स्थूल न कृशहि न, वय चवदाची ॥धृ०॥ नयन मनोहर वनहरिणीचे, नाक सरळ जशि काळ चांफ्याची ॥१॥ भृकुटि वांकड्या, केश सडक मृदु, दंतपंक्ति ती कुंदकळ्यांची ।।२।। ओठ पोवळी, हनु चिंचोळी, लालि गुलाबी गालांवरची ॥३॥ भद्रे- भद्रे ०- - " 2