पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ द्यावयाची ती देऊन बिदा केले. गोटास आले. आणि छ० २१ जिल्कादी तोहमास्तकुली महमदशहाच्या डेऱ्यास येणार. परंतु पाहतां नवी सृष्टि दिसते. गारुड कळत नाहीं." असें लिहिलें. पत्रे कालच आलीं व दुसरें वर्तमान बहाणपुराहून लिहिलें कीं, महमदशहा पातशहास दस्त केलें; तोहमास्तकुली दिल्लीस येऊन तक्त बसले; द्वाही फिरविली; सादतखा- नास नवाबात सांगितली; ऐसें दिल्लीहून सावकारीं लिहिले आहे. त्याव- रून बऱ्हाणपुरच्या कमाविसदारांनी लिहून पाठविले आहे. हिंदुलोकांस संकट थोर प्राप्त झाले आहे. एक त्याची पातशाही बुडाली यांत संदेह नाहीं. आह्मांसही भारी आहे. स्वामींचा आशीर्वाद मस्तकीं असतां काय चिंता आहे. सविस्तर विदित व्हावें ह्मणून लिहिले असे. अरिष्ट तो मोठें निर्माण झालें; आझी तो कर्जानें बुडालों व अवंदा पैसा कोठें प्राप्त नाहीं. संस्थानें वर्षास खडी, तो तींही अवंदा राहिलीं पोटाचेंच संकट प्राप्त जाहलें आणि अरिष्ट तो मोठें उभें राहिले आहे. बरें, सर्व चिंता आपल्यास आहे. आपण पुढील विचार मनन करून लिहून पाठवावें. आझी लेंकरें तुमच आहों. सर्व चिंता तुझांस आहेच. अ द्याप वसई आली नाहीं. परंतु आपले आशीर्वादें येईल. आवजी कवडे रघोजी भोंसल्याचे फौजेनें लुटली. ऐसा चहूंकडून आह्मांवर कसाला प्राप्त झाला आहे. असो. हे घरचे कजिये, परंतु पुढील अरिष्ट थोर आले आहे, आणि पैसा नाहीं. या गोष्टीस योग कसा घडेल तें लिहा- वयास आज्ञा केली पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. १ घरचे कजिये:-घरचे तंटे. पोर्तुगीज लोकांचें व मराठ्यांचें युद्ध चालले अ सतां रघोजी भोंसले सेनासाहेब सुभे यांच्या पुतण्याने मराठ्यांस मदत करण्याचें सोडून देऊन अहमदाबादेपर्यंत स्वाऱ्या करून तिकडे लुटालूट चालविली. तेव्हां त्यावर पेशव्यांनी आवजी कवडे यास बंदोबस्तास पाठविलें; परंतु त्याचा त्याणे पराभव केला. हें वर्तमान पेशव्यांस कळतांच ते तिकडे जाणार तो हैं नादिरश- हाचे वर्तमान आले. अर्थात् हे आपसांतील कब्जे इकडे चालले होते तोंच पुनः हें अरिष्ट आले त्यामुळे पेशव्यांस महत् संकट वाटणे साहजिक आहे.