पान:श्री दादा नाईक जीवन दर्शन.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रास्ताविक प्रत्येक कालखंडात निरनिराळ्या विचारांची, दृष्टीची, प्रवृत्तीची माणसे विद्यमान असतात. त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ती जीवन जगत असतात आणि काल- चक्रानुसार जीवनचक्रही फिरत राहात असते. या जीवनक्रमाला वेगळे वळण आणि दिशा देण्याचे कार्य ज्ञानी, द्रष्ट्या पुरुषांकडून होत असते. त्यांतील काही सर्वज्ञात असतात, काही अल्पज्ञात, तर काही अज्ञातही असतात. प्रसिद्धीच्या प्रकाशात न येताही अशा ज्ञानी पुरुषांकडून समाजधारणेचे आणि परिवर्तनाचे कार्य होत असते. सामान्य सांसारिकांच्या सहवासात राहून त्यांचे जीवन उजळण्याचा, सुखमय करण्याचा प्रयत्न ते करीत असतात. ते त्यांच्यापैकीच एक असतात आणि नसतातही. लोकाधारे वर्तन करून विश्व मोहरे नेण्याचे कार्य त्यांच्याकडून होत असते. भारतीय संस्कृतीचा किंवा जीवनसरणीचा एक विशेष हा आहे, की प्रत्येक भारतीय एका विशिष्ट तत्त्वज्ञानसूत्राने जीवन जगत असतो. त्यांचे जीवन ज्ञानी पुरुषाच्या सहवासाने संपन्न बनते. त्याला समाज हवा असतो आणि समाजाला तो हवा असतो. त्याच्या पदचिन्हांवरून वाटचाल करण्यात सामान्यांना धन्यता वाटते आणि आपण योग्य त्या स्थळी पोहचू, याचा मनोमन विश्वासही असतो. ती. स्व. धोंडो श्रीपाद तथा दादा नाईक हे अशा ज्ञानी पुरुषाचे आजच्या काळातील प्रतीक रूप आहे. प्रस्तुत ' जीवन दर्शन ' ग्रंथात त्यांच्यावर अलोट प्रेम पाच