पान:श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९) साधक :- पिंजऱ्यातील पोपटास दार सताड उघडे ठेवले असताही बाहेर पडून स्वतंत्र होण्याची इच्छा होत नाही. त्याप्रमाणेच आपले आहे. नामस्मरण करुन मुक्त होण्यापेक्षा, मायेत, दुःखांत राहाणे यांतच आपण सूख मानतो.

१०) साधकानी कल्पित कादंबरी, कल्पित कथा वाचू नयेत. नेम, (साधन किंवा नामस्मरण )

बैसोनि निवांत शुद्ध करी चित्त । तया सुखा अंतपार नाही ॥
येऊनि अंतरी राहील गोपाळ | सायासाचे फळ बसलीया ||
रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी । मंत्र हा उच्चारी वेळोवेळा ||
तुका म्हणें ऐसे देईन मी दिव्य । जरी होईल भाव एकविध ||

 वरील अभंगाला अनुसरून निवरगी संप्रदायात नामस्मरण व मनाची एकाग्रता हीच श्रेष्ठ साधना आहे. त्या साधनेला नेम म्हणतात.

 १)एकाच आसनावर वराच वेळ न हालता, न डुलता वसणे जरुर आहे. नेमांत झोप आल्यास हरकत नाही. पण नेमास वसणे जरुर आहे.
 २) नेमाची वेळ शक्यतो ठरलेली असावी. प्रसंगी वेळ मिळेल तेव्हांही नेम करावा. कमीत कमी तीन तास नेम करावा.
३)संधीकालांत जो नेम करतो त्याचे आयुष्य व वळ वाढते.
४) रात्री नेमास वसले असताना पाठ केलेला अभंग व पद म्हणावे; वाचून म्हणू नये.
५ ) सर्वात श्रेष्ठ नेम म्हणजे सहा तास वसणे.
६) जेव्हां कांही ठराविक नेम करावयाचा असेल तेव्हां माळ वापरावी. श्वास ही मनाला वधन, दोरी आहे. नाम व रूप हीही दोरीच.

8