पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. श्री वाल्मीकिरामायण हे आदिकाव्य आहे. आर्य लोकांच्या राष्ट्रीय ग्रंथांमध्ये याची गणना होते. या सर्वमान्य ग्रंथांतील निवडक ५०० सुभाषित वचनांचा संग्रह प्रस्तुत पुस्तकांत केला आहे. वचने वर्णक्रमाने दिली असून त्यांच्या डावीकडे क्रमांक घातले आहेत आणि उजवीकडे स्थलनिर्देश केला आहे. स्थलनिर्देशांत कांड, सर्ग व श्लोक अशा क्रमाने अंक मांडिले आहेत. वचन प्रक्षिप्त सर्गापैकी असल्यास मुख्यस र्गाचा व प्रक्षिप्त सर्गाचा असे दोनही अंक मांडिले आहेत. वचनांच्या शेवटी मुख्य | विषयांची सूची जोडिली आहे. जो विषय ज्या वचनांत आला, त्या वचनाचा क्रमांक त्या विषयापुढे सूचीमध्ये घातला आहे. सूचीमध्ये एकाच अर्थी आलेले अनेक शब्द आरंभी स्वतंत्र दिले आहेत. ही सुभाषित वचने सर्वांच्या वाचनात येवोत, अशी श्रीरामप्रभूजवळ प्रार्थना करून प्रस्तावना संपवितों. चैत्र शुक्ल ९ शके १८५० विष्णु विनायक परांजपे. काण्डक्रमः ५ सुंदरकाण्डम् १बालकाण्डम् २ अयोध्याकाण्डम् ३ अरण्यकाण्डम् ४ किष्किन्धाकाण्डम् ६ युद्धकाण्डम् ७ उत्तरकाण्डम् CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri