पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ . श्रीमद्भगवद्गीता. श्रीभगवानुवाच । मय्यासक्तमनाः पार्थ योगं युंजन्मदाश्रयः। असंशयं समनं मां यथा ज्ञास्यसि तच्छुणु ॥ १॥ 'ज्ञान' व 'विज्ञान' झणजे काय आणि परमेश्वराचे पूर्ण ज्ञान होऊन कमें न सोडितांहि कर्मयोगमार्गातील ज्या विधींनी अखेर निःसंशय मोक्ष मिळतो ते विधीहि सांगणे, आतां ओघानेच प्राप्त झाले; आणि तोच विषय सातव्या अध्यायापासून सतराव्या अध्यायाचे अखेर अकरा अध्यायांत वर्णिला असून, शेवटच्या ह्मणजे १८ व्या अध्यायांत सर्व कर्मयोगाचा उप. संहार केलेला आहे. सृष्टीत अनेक प्रकारचे जे अनेक विनाशी पदार्थ आहेत स्या सर्वात एकच अविनाशी परमेश्वर भरून राहिला आहे हे समजणे याचे नांव 'ज्ञान' आणि एकाच नित्य परमेश्वरापासून विविध नाशवंत पदार्थ कसे होतात हे समजणे याचे नांव 'विज्ञान' होय (गी. १३.३०) व यासच क्षराक्षरविचार असे म्हणतात. परंतु याखेरीज स्वताच्या शरीरांत म्हणजे क्षेत्रांत ज्याला आत्मा असं म्हणतात त्याचे खरे स्वरूप काय है जाणिल्यानेहि परमेश्वरस्वरूपाचा बोध होतो. अशा प्रकारच्या विचारास क्षेत्रक्षेत्रज्ञविचार असे म्हणतात. पैकी क्षराक्षरावेचारात प्रथम सुरुवात करून पु क्षेत्रक्षेत्रज्ञविचार तेराध्या अध्यायांत वाजला आहे. पण परमेश्वर एक असला तरी त्याचे अध्यक्त स्वरूर केवळ बुद्धिमाम तर व्यक्त प्रत्यक्षावगम्य असेहि उपासनेच्या दृष्टीने त्यात दोन भेद होतात. झणून बुद्धीने परमेश्वर कसा ओळखावा, अाणि श्रद्धेन अगर भक्तीने व्यक्त स्वरूपाची उपासना करून तदद्वारा अन्यक्काचे ज्ञान कसे होते,दोन्ही मार्ग किंवा विधि याच निरूपणांत सांगावे लागतात. तेव्हा या सर्व विवेचनास अकरा अध्याय लागले तर स्यांत काही नवल नाही. शिवाय या दोन मार्गानी परमेश्वराच्या झानाबरोबरच इंद्रियनिग्रहहि आपोआपच हान असल्यामुळे केवळ इंद्रिय- निग्रह प्राप्त करून देणान्या पातंजल योगमागापेक्षा ज्ञान व भक्ति या