पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ६. १४॥ नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकांतमनश्नतः। न चातिस्वमशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ।। १६॥ युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कमेस। युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥ १७ ॥ ही एकाग्रता अगर समाधि परमेश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान होण्याकडे लाविली पाहिजे, व तसे झाले झणजेच हा योग सुखकारक होतो, एरवीं हे नुस्ते कैश होत, असे गीतेचे मणणे आहे; व हाच अर्थ पुढे २९, ३० व अध्यायाचे अखेरीस १७ व्या श्लोकांत पुनः आलेला आहे. परमेश्वराचे ठिकाणी निष्ठा नसतां केवळ इंद्रियनिग्रहाचा योग अगर तालीम ज्यांनी केली ते जारण, मारण अगर वशीकरण वगैरे लोकांना त्रास देणारी कर्मे करण्यांत मात्र प्रवीण बनतात. ही अवस्था गीतेसच काय पण कोणत्यादि मोक्षमार्गास हष्ट नाही. आतां पुनः या योगक्रियेचाच जास्त खुलासा करितात-] (१६) अतिशय खाणारास किंवा मुळीच काही न खाणारास, आणि अति झोपाळूस किंवा जागरण करणान्यास (हा) योग, हे अर्जुना ! सिद्ध होत नाही.(१७) ज्याचा आहारविहार माफक, कर्माचरण बेताचे आणि प्रोप व जागरण परिमित त्याला (हा) योग दुःखघातक ह्मणजे सुखावह होतो. । या श्लोकांत 'योग' ह्मणजे पातंजल योगाची क्रिया व 'युक्त' ह्मणजे माफक बेताची किंवा परिमित असे अर्थ आहेत; व पुढेहि एकदोन ठिकाणी योग म्हणजे पातंजल योग असाच अर्थ आहे. तथापि तेवल्याने या अध्ययांत पातंजल योगच स्वतंत्र प्रतिपाद्य आहे असे होत नाही. कर्मयोग सिद्ध करून घेणे हे आयुष्यातील प्रधान कर्तव्य असन त्याला साधनाभत ह्मणन तेवढ्यापुरते पातंजल योगाचे वर्णन आहे असें पूर्वी स्पष्ट सांगितले असून, या श्लोकांतील "कर्माचे योग्य आचरण " या शब्दांनीहि इतर कम न सोड़िता हा योगाभ्यास करा. - - - - - - - - - - - -