पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ४. देवमेवापरे यशं योगिनः पर्युपासते । ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ।। २५॥ यापेक्षा अर्पण म्हणजे अर्पण किंवा हवन करण्याची क्रिया असा अर्थ करणे अधिक सरळ होय. ब्रह्मार्पण म्हणजे निष्काम बुद्धीने यज्ञ करणा- रांचे हे वर्णन झाले. आतां देवतोद्देशाने अर्थात् काम्य बुद्धीने केलेल्या यज्ञाचे स्वरूप सांगतात--1 (२५) कित्येक (कर्म-) योगी (ब्रह्मबुद्धीच्या ऐवजी ) देवादि. कांच्या उद्देशानं यजन करितात; आणि कित्येक ब्रह्मानीत यज्ञानेच यज्ञाचें यजन करितात. । पुरुषसूक्तांत विराटरूपी यज्ञपुरुषाचे देवांनी यजन केले- यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः "-इत्यादि जे वर्णन आहे (ऋ. १०.९०.१६), त्याला अनुलक्षून या श्लोकाचा उत्तरार्ध असून ' यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति' ही पर्दे ऋग्वेदातील 'यज्ञेन यज्ञमयजन्त' यांशी समानार्थक म्हणून योजि- लेली दिसतात. सृष्टीच्या आरंभी झालेल्या या यज्ञांत ज्या विराटरूपी पशूचे हवन केले तो पशु व ज्या देवाचे यजन केलें तो देव हे ब्रह्मरूपच असले पाहिजेत हे उघड आहे. सारांश, सृष्टीतील सर्व पदार्थात नेहमींच ब्रह्म भरलेले असल्यामुळे निरिच्छ बुद्धीने सर्व व्यवहार करीत असतां ब्रह्मा- मेंच नेहमी ब्रह्माचे यजन होत असते, असे जे २१ व्या श्लोकांत वर्णन आहे तेच तत्वदृष्टया खरे होय; बुद्धि मात्र तशी झाली पाहिजे. पुरुषसू. क्ताला अनुलक्षून गीतेत हा एकच श्लोक नसून पुढे दहाव्या अध्यायां- तहि (१०.१२) या सूक्ताला अनुसरून वर्णन आहे. देवतोद्देशाने केलेले यज्ञ सांगितले, आतां अग्नि, हवि इत्यादि शब्दांचे लाक्षणिक अर्थ घेऊन प्राणायामादि पातंजल योगांसील क्रिया किंवा तपाचरणहि एक प्रकारचा यज्ञ कसा होतो, ते सांगतात--]