प्रास्ताविक शब्द. महाराष्ट्र वाङ्मयाच्या अभिवृद्धयर्थ यत्न करावा, ग्रंथकारांस ग्रंथप्रका- शनाचे काम साहाय्य करावें व महाराष्ट्र वाचकवर्गीस शक्य तितक्या कमी किंमतीत मनोरंजन व बोध यांची जोड करून देणारे ग्रंथ उपलब्ध करून द्यावे, या हेतूनें शके १८३२ च्या विजया दशमीचे सुमुहूर्तावर पुणे येथें " रसिकरंजन ग्रंथप्रसारक मंडळी " या नांवाची संस्था स्थापन झाली. ग्रंथ पहिला. पृष्ठसंख्या किंमत ८१२ डेमी २००. सुभाषित आणि विनोद. व्ही. पी. खर्च [ कागद ग्लेज.. निराळा. सुभाषित, विनोद, हास्यरस, वगैरे गोष्टींचें शास्त्रीय व तात्त्विक विवेचन करणारा मराठी भाषेतील हा पहिलाच अपूर्व ग्रंथ होय. - लेखकः - श्रीयुत नरसिंह चिंतामण केळकर, बी. ए. एल्एलू बी. संपादक-केसरी व मराठा. हा ग्रंथ खरोखरच किती अपूर्व आहे हे त्याजवरील डेक्कन व्हर्नाक्युलर सोसायटींतील परीक्षकांचे अभिप्राय वाचल्यानें कळून येईल. अभिप्राय. ( १ ) सदर निबंधांतील विषयाचे प्रतिपादन रा. केळकर यांनी फोरच विद्वत्तापूर्ण रीतिनें केलेले आहे. अनेक टीकाकारांच्या मतांचा आधार देऊन त्यांनी आपले सिद्धांत सिद्ध केले आहेत; व या काम संस्कृत कवि- ग्रंथकार, तर्सेच प्रख्यात इंग्रजी कवि, नाटककार, कादंबरीकार, वगैरेच्या ग्रंथांतील उतारे व अवतरणांचाहि उपयोग केला आहे. विषयाची मांडणी शास्त्रीय तत्त्वज्ञानपद्धतीस अनुसरून आहे.
पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/६
Appearance