Jump to content

पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२ ) तच्चाकाश (ख्यं भूतमनेन प्रकारेण परमात्मनः संभूतं प्रस- नादिव सलिलान्मलमिव फेनम् । अर्थ:- ह्याप्रमाणे त्या परमात्म्यापासून आकाश नांवाचें एक भूत उत्पन्न झाले. पाणी स्वच्छ असतां त्यापासून मळकट फेंस होतो त्याप्रमाणें हें झालें. न सलिलं नच सलिलादत्यन्तभिन्नं फेनम् सलिलव्य- तिरेकेणादर्शनात् । सलिलंच स्वच्छं अन्यत् फेनान्मलरूपात् । अर्थः --फेंस कांहीं पाणी नव्हे. पण पाण्याहून अगदी निराळी वस्तू फेंस आहे, असे ह्मणतां येत नाहीं, कारण पाण्याचें व फेसाचें स्वरूप एकच आहे. पण पाण्याहून तो फेंस निराळा खरा. पहा बरें, पाणी स्वच्छ असतें, फैसे मळकट, घाणेरडा वेगळा दिसतो नव्हे ? व एवं परमात्मा नामरूपाभ्यामन्यः फेनस्थानीयाभ्यां शुद्धः प्रसन्नस्तद्विलक्षणः । अर्थः--ह्याप्रमाणे, पाण्यांतल्या फॅसाच्या ठिकाणीं इकडे नाम आणि रूप घ्यावें, त्यांच्याहून परमात्मा निराळा, पवित्र, नेहमी सुप्रसन्न, त्या नामरूपांहून मात्र निराळा आहे. ते नामरूपे अव्याकृते सती व्याक्रियमाणे फेनस्थानीये आकाशनामाकृती संवृत्ते ॥ १९ ॥ - अर्थः -- प्रथम प्रगट नसलेलें तें नाम आणि रूप प्रगट होतांच फेसासारखें समजावें. त्याला प्रथम आकाश हे नांव आणि आ कृति आली. ततोऽपि स्थूलभावमापद्यमाने नामरूपे व्याक्रियमाणे वायुभावमापद्यते, ततोऽप्यग्निभावं, अग्नेरब्भावं, ततः पृथ्वी.