पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. २. ] भुज्युब्राह्मण-पारिक्षित मुक्ति. ३५ पण तसे घेतलें असतां 'दृष्टीचा ह्या षष्टचन्त पदानें दृष्टि हा अर्थ घेणें व्यर्थ होईल, जास्त होतें. हा दोष त्यांस दिसत नाही. हा पुनरुक्ति दोष दिसत असला तर, 'दृष्टेष्टारं' यांतील पुनरुक्ति महत्वाची नाही किंवा चुकीची आहे, असे मानून दुर्लक्ष करीत असावे, असें ह्मटलें पाहिजे ). 'दृष्टे:' हें पद अधिक कसें ? तृ प्रत्ययान्त 'द्रष्टा' शब्दानें दृष्टीचा कर्ता असा अर्थ होतोच; ह्मणून ‘दृष्टेः ' हें पद व्यर्थ अधिक आहे. मग 'द्रष्टारं न पश्येत्' इतकेंच ह्मणावयास पाहिजे; कां तर ‘द्रष्टा' शब्दामध्यें दृश् धातूच्यापुढें तृ प्रत्यय श्रुतीत आहे; आणि धातुनिर्दिष्ट 'अर्थाचा कर्ता असें तृ प्रत्ययानें होतें, अशी (पाणिनि ) स्मृति आहे. गन्त्याला किंवा भेत्त्याला नेतो अशी वाक्यें लिहितात; पण गतीच्या गन्त्याला, भेदाच्या भेत्त्याला असे काही अर्थविशेष दाखवावयाचा नसल्यास लिहीत नाहींत. श्रुतींतील 'दृष्टेर्द्रष्टारं ' ह्या पाठाचा अर्थ इतर रीतीनें होत असल्यास अर्थवाद ह्मणून दृष्टि शब्द वगळूं नये; किंवा तो चुकीचा पाठ आहे असें ह्मणूं नये; कारण (काण्व, माध्यंदिन वगैरे ) सर्वांचे (पाठ) अविगीत (अनिंद्य ) आहेत. (सदरचें ) व्याख्यान करणारांचीच बुद्धि दुर्बल आहे. अध्ययन करणाऱ्यांनी ( वेद ह्मणणा- ज्यांनी ) प्रामादिक पाठ घातला आहे असें नाहीं. 6 6 १ पण ज्याप्रमाणे लौकिक दृष्टि भिन्न करून नित्य दृष्टियुक्त आत्मा दाखवावा, असा आह्मीं अर्थ केला, त्या तऱ्हेनें मूळांतील दृष्टि शब्द एक वेळ कर्त्याला लागू, व एक वेळ कर्माला लागू, अशा विशेष अर्थानी दोनदां घातला आहे हे ह्मणणें ठीक बसतें; ही योजना आत्मस्वरूपाचा निश्चय करण्याकरितां आहे. ‘ द्रष्टयाच्या दृष्टीचां' असें अन्यठिकाणी वाक्य आहे, त्या वाक्याशी याग्य. एकवाक्यता होते. आणि त्याप्रमाणें 'चक्षूस पाहतो, ' ' हें श्रवणेंद्रिय ऐकिलें' अशा अन्य श्रुति आहेत, त्यांशींहि एकवाक्यता होते, आणि न्यायपद्धति अशीच आहे; कांतर, आत्म्याला विकार होत नाही ह्मणून त्याचें नित्यत्व सिद्ध होतें. ज्यास विकार होतो तें नित्य असें ह्मटले असतां असंबद्ध भाषण होईल. आत्मा जणूं ध्यान करितो, जणूं चलनवलन करितो, द्रष्टयाच्या दृष्टीचा लोप होत नाहीं, असें ब्राह्मणा ( ब्रह्मा )चें महत्व आहे, अशा अन्य श्रुती आहेत, त्या इतर रीतीनें बसणार नाहींत. द्रष्टा, श्रोता, मन्ता, विज्ञाता, हीं विशेषणें आत्मा अविक्रिय आहे, असे मानलें तर लागूं पडत नाहीत, असें ह्मणशील तर नाहीं; कारण, हीं विशेषणें लोकवादाला अनुसरून आत्म्याला प्राप्त झाली आहेत. आत्म्याचा मूळस्वभाव निश्चित करण्यास ती विशेषणे दिली आहेत, असे नाहीं. दृष्टीचा द्रष्टा वगैरे विशेषणांचा दुसरा ( दृष्टिचा कर्ता असा ) अर्थ संभवत नाही. ह्मणून आह्मी सांगितलेल्या अर्थाचीच ( ही श्रुति ) आहे असे वाटतें; ह्मणून ( तुला ) समजेनासे झाल्यामुळेच 'दृष्टीचा ' ह्या द्रष्टयाचे विशेषणाकडे तूं दुर्लक्ष्य केले आहेस. हा तुझा आत्मा सर्व विशेषणांनी युक्त आहे. या आत्म्याहून अन्य सर्व वस्तु आर्त ह्मणजे कार्यरूप शरीर किंवा करणरूप लिंगदेह आहेत. हे ( ब्रह्म ) एकटेंच कूटस्थ अनार्त- अविनाशी आहे. इतकें ऐकून उषस्तचाक्रायण स्तब्ध झाला. अध्याय ३, ब्राह्मण ४, समाप्त. १ –' कर्तरितृच' २–' न हि द्रष्टुईष्टेः ' बृ. ४-३-२३. ४–' श्रोत्रमिदं श्रुतं' केन ७. ३ –' चक्षूंषि पश्यति केन ६.३