पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. पुणे, पेठ सदाशिव घर नंबर ७८४. fzr3 २४ अत्यन्त शुद्ध, सरळ सुबोध व खुलाशाच्या टीपांसहित ती० काशिनाथ बाळकृष्ण मराठे, भगवानदास पुरुषोत्तमदास संस्कृतस्कॉलर यांनी केलेले भाषान्तर विद्वज्जनांस अर्पण करीत आहोत. तें छापून सर्व लोकांस उपयोगी होण्याकरितां विद्याभिवृद्धि करूं इच्छिणारे उदार आश्रयदाते व बुभुत्सु लोक आश्रय देतील अशी आशा बाळगतों. हा बृहदारण्यकाच्या दुसरा खंडाचा पहिला भाग आहे. दुसरा भाग ( अध्याय ४ ) लौकरच छापून तयार होईल. तातपादांनीं अत्यंत परिश्रमानें हैं भाषांतर केले असून अद्वैतज्ञांचा प्रसार होऊन देशबां- धवांनी परमार्थाचा विचार करावा ह्मणून ह्या अध्यायाची किंमत अगदी अल्प ८८ आणे ठेविली आहे. विष्णु काशिनाथ मराठे,