पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. १, ऋचा ४ - याज्ञवल्क्या, अशी हाक मारून अश्वल पुन्हा ह्मणाला, जें हें सर्व अह(दिवस) आणि रात्र यांनी व्यापिलेले आहे; सगळे अहोरात्रींनी आपलेसें केलें आहे, तर कोणत्या (उपायानें) यजमान अहोरात्रींची व्याप्ति मार्गे टाकून मुक्त होतो ? (उत्तर)- अध्वर्युऋत्विज, चक्षुरिंद्रिय, आदित्य ह्यांनीं (अतिमुक्ति प्राप्त होते). डोळा (चक्षु) हाच यजमानाचा अध्वर्यु. तें जें हें चक्षुरिंद्रिय, तो हा आदित्य; तो अध्वर्यु; तो मुक्ति; ती अतिमुक्ति. भाष्य – ' याज्ञवल्क्या, अशी हाक मारून ह्मणाला. ' स्वाभाविक अज्ञानामुळे ( विषया- ) सक्तियुक्त कर्मस्वरूप मृत्यूपासून होणारी अतिमुक्ति वर्णिली. आसक्तियुक्त कर्मरूपी मृत्यूची स्थळे दर्शपूर्णमास वगैरे; त्या कर्माच्या साधनाचें ( प्रतिक्षणी ) रूपांतर होण्याला कारणीभूत जो कालस्वरूपी मृत्यु, त्या मृत्यूपासून वेगळी अतिमुक्ति कशी होते ? हें सांगावें ह्मणून या ( ऋचे) चा आरंभ आहे. कर्मानुष्ठानाच्या अभावी देखील क्रियेच्या पूर्वी व मागून क्रियेच्या साधनाच्या रूपां- तराला कारणीभूत कालव्यापार चालू असतो; ह्मणून कालापासून स्वतंत्रपणें अतिमुक्ति सांगितली पाहिजे. याकरितां (श्रुति ) सांगते की, 'जें हें सर्व अहोरात्रींनी व्याप्त आहे,' तो काळ अहोरात्र स्वरूपानें व तिथ्यादिस्वरूपानें दोन रूपांचा आहे; पैकी अहोरात्रस्वरूप काळापासून अतिमुक्ति कशी होते, हें (श्रुति ) सांगते ( सदरहु ऋचेंत सांगितले आहे). अहोरात्रीपासूनच सर्व उत्पन्न होतें, वृद्धि पावतें, व नाश पावतें. त्याप्रमाणेंच यज्ञसाहित्य (उत्पत्तिस्थितिविनाशाप्रत जातें ). यज्ञस्व- रूप यजमानाचा डोळा (चक्षु) व अध्वर्यु (वगैरे) बाकी वर्णनाचा पूर्वीप्रमाणें अर्थ करावा. यजमा- नाचा डोळा व अध्वर्यु ही दोन साधनें यांचें अध्यात्म ( शारीरिक ) आधिभौतिक (पंचभूतात्मक) स्वरूप सोडून देऊन त्याविषयी आधिदैवत आदित्यदृष्टि ठेविली असतां तो मुक्ति. तीच-मुक्तीच- अतिमुक्ति. ह्याप्रमाणें पूर्वी सारखाच आपण तो आदित्य अशी भावना ठेवणाऱ्याला अहोरात्री संभवत नाहींत. ऋचा ५ – याज्ञवल्क्या अशी (अश्वलानें) हाक मारून पुन्हा ह्मटलें. जें हैं सगळें शुक्लपक्ष, कृष्णपक्ष, (पूर्वापरपक्ष) ह्यांनी व्यापले आहे, सगळें या पक्षांनी आपलेसें केलें आहे, (तर) कोणत्या उपायानें यजमान पूर्वपक्ष व अपरपक्ष यांची व्याप्ति मार्गे टाकून मुक्त होतो ? (उत्तर), उद्गाताऋत्विज, वायु, प्राण ह्यांनीं (ह्यांचे ज्ञानानें अतिमुक्ति मिळते. ) प्राण तोच यज्ञाचा उद्गाता; त्यांत जो हा प्राण तो वायु. तो (वायु) उद्गाता. तो मुक्ति; ती अतिमुक्ति. भाष्य-आतां तिथिस्वरूपी काळापासून अतिमुक्ति सांगितली आहे; 'जें हें सर्व' अहोरात्री एक सारख्या (वृद्धिश्चयरहित ) असतात, त्यांचा उत्पादक आदित्य आहे. प्रतिपदा वगैरे तिथींचा तो उत्पादक नाहीं. तिथींना वृद्धिक्षय असतो, व त्या प्रतिपदादिक तिथींचा उत्पादक चंद्र आहे. ह्मणून १ – प्रति पौर्णिमेला व अमावास्येला अग्निहोत्री इष्टि करीत असतात. ते यज्ञ व चातुर्मास्येष्टि, अग्निष्टोम, जोतिष्टोम, वाजपेय वगैरे यज्ञ, ४८ संस्कारांपैका आहेत. २ – कर्मापासून मुक्ति सांगितली ह्मणजे काळापासून मुक्ति सांगितल्यासारखी होतेच व काळाचा कर्मामध्ये अंतर्भाव आहे; तरी काळापासून वेगळी मुक्ति समजली पाहिजे,