[ ४ ] पद ६ वें. या छाती ठोक या रे । स्वदेशाकरितां ॥ध्रु०॥ सुवर्णभूमी मायभूमी ही। दास्यपाशीं पडतां ॥ १ ॥ दिडदमडीची दुही मोडुनी। चुकवुं राष्ट्रघाता ||२|| जाती मत्सर विसरू सारे । धरूं ऐक्य पंथा ||३|| धर्म आम्हा प्राणाहुन प्यारा। पटनु तत्व जगता ॥४॥ संघटनात्मक कार्य चालवू । नको मार्ग भलता ॥ ५ ॥ स्वावलंबने स्वतंत्र व्हावें । हेच ध्येय आतां ॥ ६ ॥ ॥ स्वातंत्र्याचे वाण सतीचें । भिकेची न मत्ता ॥ ७ ॥ प्रयत्न करणे आपुल्या हातीं । प्राथुन भगवंता ॥ ८ ॥ 2 पद ७ वें. डोळे उघडा अजुनी को जागे व्हाना ? | देश सारा पेटला ना ॥ ध्रु० ॥ देशाला वाली नुरला | दीन बनला । कलहानें पोखरीला | भेद केला । अन्नान्न दशा बहू आली। वस्त्राविण उघडी पडली । जनता ही । आजि पाही । स्वरि येई। शुद्धीवरि हिंदुस्थाना ॥ १ ॥ भारतेया सौख्य यावें । कुदिन जावे। जगणें हें सार्थ व्हावें । नांव रहावें । स्वातंत्र्यवीच्या किरणीं । नांदण्या सुखे दिनरजनीं । ऐक्य करुं। दुहि मारू । जन तारू । बंदुनिया श्रीहरी चरणा ॥ २ ॥ पद ८ वें. तोड आतां मोहपाशा | उठ तरुणा भारता । मायभूमी मृत्युशयनीं । धरिसी केवी शांतता ॥ ध्रु० ॥ अन्न नाहीं
पान:श्रीनामदेव मेळ्याचीं पद्यें सन १९२५.pdf/५
Appearance