Jump to content

पान:श्रीनामदेव मेळ्याचीं पद्यें सन १९२५.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ श्रीगजानन प्रसव || श्रीनामदेव मेळ्याचीं पदें सन १९२५ पद १ लें. कलिमद हरणा साधु तारणा । गिरिज्या रमणा घे धांव झणीं ॥ध्रु०॥ विद्या यश बल ऋद्धि-सिद्धी । बसो भारती विनवी चरणीं । अज्ञ बालकें तुझीच आम्हीं । कृपाकटाक्षै घे सांभाळुनी ॥ १ ॥ पद २ रें. H ही तुझी विश्वमाया । गुंगवी मतीला ॥ ध्रु० ॥ जगत्- पटावर जन्म-मृत्युचा खेळ चालविला ॥ १ ॥ विश्वामाजीं चमत्कृतीचा सांठा सांठविला ॥ २ ॥ पंचभूतांचे विश्व बनविले अगम्य तव लीला ॥ ३ ॥ जगा व्यापुनी कसा पुनरपी अष्टांगुल उरला ॥४॥ शक्य काय ना जगामधें या अंत न कोणाला ॥ ५ ॥ हे क्षणभंगुर आयु अपुरे लीला बघण्याला ॥ ६॥ कवी रामाची स्वयंप्रकाशित काव्यस्फूर्ति बाला ॥ ७ ॥