Jump to content

पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा. ८९ लोक, मी मोठा आणि तो लहान, असे ह्मणत असतात ! तुमचे शरीर कोणाचे आहे ? तुमच्या शरिरांत कोण नांदत आहे ? हें तुह्मी मी लिहिलेली दोन अक्षरे वाचून त्यांचे मनन करून ओळवून घ्या ! जिवास कष्ट देऊन योग साधन केले असतां ऋद्धिासद्धि प्राप्त हेातील, परंतु आत्मज्ञानाशिवाय साच्चिदानंदस्वरूपाची ओळख कालत्रयींही होणार नाहीं ! आणि ब्रह्माची ओळख झाल्याशिवाय मनांतील द्वैतभाव नष्ट होणार नाहीं ! सर्व इंद्रियांत मनाची चंचलता फार आहे ! ते सैरावैरा धांवत सुटते ! तेव्हा त्याला आपल्या स्वाधीन करून घेऊन, विचार-. दृष्टीनें परब्रह्माकडे पाहिले पाहिजे ! परब्रह्म वेदांनासुद्धा अगोचर आहे ! त्या ठिकाणी प्राणीमात्रांची जाणीव कुंठित होते ! परंतु सद्गुरुकृपेने त्याचे ज्ञान प्राप्त होते ! आतां आपणांस जास्त काय सांगावे ? जे तुमच्या हृदयीं वसत आहे, तेच मी अनुभवाने जाणून, या पत्रीं उघड करून लिहले आहे ! तरी मनांत द्वैतभाव न धरितां, या पत्राचे नित्य मनन करून यांतील अर्थ नीट समजून घ्यावा ! आणि मीं पत्र लिहिलेले हे वेदशास्त्रांचे मथन जिवासी जतन करून ठेवा ! झणजे तुह्मी चौदाशे वर्षे रक्षण केलेल्या देहाचे सार्थक होऊन तुह्मी कैवल्यपदाप्रत जाल ! चांगदेवाशिष्य- सद्गुरुमुखांतून स्रवणारे हे बोधामृतं आज मला अल्पतरी सेवन करण्यास मिळाल्याने मी धन्य झालों ! जगद्रूंचा निरोप मी स्वामींस कळवून, जगद्गुरुंनी दिलेली ही अनुग्रहपत्रिका, जगनुरूंच्या आज्ञेप्रमाणे स्वामींस नेऊन देतों ! परंतु जगद्गुरूंपुढे मी अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने नमविलेल्या या मस्तकावर, जगद्गुरूंनी आपला, वरदहस्त एकवार ठेवून मला धन्य करावे, हेच माझे जगद्गुरुचरणी लीन होऊन मागणे आहे ! ( श्रीज्ञानेश्वरमहाराज शिप्याचे मस्तकावर हात ठेवितात. शिष्य लोटांगण घालून निघून जातो. ) ज्ञानेश्वर- मुक्ताबाई, श्रीसद्गुरु निवृत्तिनाथांच्या पादसेवनाची वेळ झाली. तर चला आपण आतां सद्गुरुसेवेकरिता आंत जाऊ ! ( पडदा पडतो. )