Jump to content

पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा. नमस्कार करूं या ! (आसनावरून साली उतरुन शिष्यापुढे नमस्कार घालतात. ) मुक्ताबाई, यांना नमस्कार कर. ( मुक्ताबाई पुढे होऊन शिष्यास नमस्कार करते. तिच्या मागून सर्व पुरुष व स्त्रियाही त्यास नमस्कार करतात. ) समर्थ चांगदेवांना आह्मां अज्ञ बालकांचे स्मरण होऊन, त्यांनीं तुम्हांबरोबर आह्मांकरिता एक आज्ञापत्र पाठविले आहे ! हा सिद्धांनी आज आमच्यावर मोठाच अनुग्रह केला ! आणि आपणही स्वामिआज्ञेने ते आज्ञापत्र घेऊन इतक्या दूर येण्याचे श्रम घेतले आणि आम्हांस तुमचे दर्शन दिले, याबद्दल आपलेही आम्हांवर थोर उपकार झाले ! सिद्धश्रेष्ठ चांगदेव कुशल आहेत ना ? आणि सिद्धांनी आम्हांला कोणती अनुज्ञा केली आहे ? चांगदेवशिष्य- (सजील होऊन) सद्रूंनीं मी सांगण्यापूर्वी च अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार ओळखिला आहे ! तेव्हां आतां मी अधिक ते काय सांगणार ! स्वामिआज्ञेप्रमाणे ही पात्रका मी सदुरुचरणी अर्पण करीत आहे; तरी सद्गुरूंनीं हिचा अंगिकार करून आमच्या स्वामींना उत्तरी जी अनुज्ञा करणे असेल ती करावी ! ज्ञानेश्वर- ( पत्र उघडून व ते कोरेच आहे असे पाहून ते मुक्ताबाईच्या हाती देतात ) | मुक्ताबाई- ( कोरे पत्र पाहून आश्चर्याने ) काय ग बाई हैं। आश्चर्य ! काळाच्या हातून चौदाशे वर्षे देह वांचवन चांगदेव मनिश्रेष्ठ एरंडासारखे उच वाढले आणि भोळ्या लोकांना आपली सिद्ध दाखवून त्यांनी दिगंतकार्ति मिळविली; तरी ते अद्यापि कोरे ते कोरेच ! चौदाशे वर्षे जगून त्यांनी काय सार्थक केलें ! अहंकार दवडण्याकरितांच नारायणाने मनुष्यदेह दिला आहे ! तेव्हां या मनुष्यदेहांतही अहंतेचे ओझे वागविणे पारमार्थिकांना अत्यंत लाजिरवाणे आहे ! विषयांची गोडी जोपर्यंत नष्ट झाली नाहीं, देहाची बांदोडी जोपर्यंत सुटली नाही, तोपर्यंत नुसत्या सोंगढोंगाने निवृत्तीच्या पैलथडी प्राणी कसा पोहोचणार ? जो देहापासून गळाला, तोच कर्मापासून सुटला! चांगदेवांनी