Gs श्रीज्ञानेश्वरमहाराज. नामाचा गजर करून मृतजीवांस जिवंत करणारे असे संतमहात्मे माझ्या अवलोकनांत आजपर्यंत कधीही आले नव्हते ! चांगदेव- बेटा, खरोखरच आश्चर्य वाटण्यासारखेच हे अद्भुत सामर्थ्य ! तू सांगतोस या हकिकतीवरून ते कोणी तरी पूर्णज्ञानी महावैष्णवसंत ब्रह्मवेत्ते जगदुद्धार करण्याकरिता साक्षात् परमेश्वर मानवदेहाने या भूतलावर अवतरले असावेत असे मला वाटते ।। ती पूर्णज्ञानी कुमारिका कोण होती, आणि तो बाल योगीश्रेष्ठ कोण होता, ती उभयतां येथे कोठून आली, आणि ती येथून कोणीकडे गेली; त्यांची नांवें काय आणि ती केाठला राहणारीं । ह्याविषयीं बुला कांहीं समजले काय ? | पहिला शिष्य- गुरुजी, ती कोण होतीं, कोठलीं राहणारी, त्यांची नांवें काय, ती कोठून आली, आणि कोणीकडे गेलीं, हे मला कांहींच समजलें नाहीं ! चांगदेव- बेटा, आम्ही आतां ध्यानस्थ होऊन, ती कोण होती हे पाहून येत ! तोपर्यंत शिष्यहो, तुम्ही क्षणैक स्वस्थ असा ! ( ध्यानस्थ होऊन व अमळशानें ध्यान विसर्जन करून ) अहाहा ! शिष्यहो, प्रतिष्ठानक्षेत्री ज्यांनी महिषमुखाने वेद बोलविले, ज्यांनी स्वर्गीचे पितर श्राद्धतिथीला भूलोकीं आणिले आणि ज्यांनी निवास क्षेत्री सच्चिदानंदबाबाला जिवंत केले म्हणून प्रतिष्ठान क्षेत्रांतील ब्राह्मण आपल्याला सांगून गेला, आणि ज्या गोष्टींच्या सत्यतेची खातरी करून घेण्याकरिता आपण प्रतिष्ठान क्षेत्री मुद्दाम शिष्य पाठविला आहे, ते साक्षात् भगवान् श्रीविष्णु, श्रीज्ञानेश्वरमहाराज, आणि त्यांची बहीण आदिमाया, मुक्ताबाई, यांनीच ही अगाध करणी केली आहे ! शिष्यहो, ऐका. या वेळी मला माझ्या पूर्वजन्माची आठवण झाली आहे ! मी पूर्वी इंद्राचा मरुद्गण होतो. एके दिवशी माझ्या हातून स्वामीसेवेत अंतर पडले. तेव्हां स्वामी क्राधयुक्त होऊन, मरुद्गणा, तू अत्यंत उन्मत्त झाला आहेस, स्वामीसेवेत तूं तत्पर नाहीस, तरी तू स्वर्गातून मृत्युलोकीं पतन पावून, मानवदेहानें प्रकट होशील, असा त्यांनी मला शाप दिला ! तेव्हां सकल देवतांत आपण श्रेष्ठ मुकुटमणी
पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/80
Appearance