Jump to content

पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ श्रीज्ञानेश्वर महाराज. कुंकू पुसल्यावर इथे जगून तरी काय करायचं आहे ? सावित्रीबाई, बसा तुह्मी खालीं. मी तुमची ओटी भरते. रमाबाई, आणा ती ओटी इकडे. ( सावित्रीबाई खाली बसते. सखुवाई तिची ओटी भरते आणि सखुबाईच्या मागून दुस-या बायका सावित्रीबाईची ओटी भरत त. ) राधावाई, व्हा पुढं नी सावित्रीबाईंची तुम्ही शेवटची ओटी भरा. राधाः- ( ओटी भरतां भरतां) माई, या तुझ्या ताईच्या हातची ही शेवटची ओटी वे! नी पुन्हा स्वर्गात जेव्हा तुझी माझी भेट होईल तेव्हा माझ्यावर इथल्यासारखी अशीच माया कर बरं ! सावित्री०- ताई, तुला आईनं नी बाबांनी माई कुठे आहे ह्मणून विचारलं, तर त्यांना ह्मणावं तुमच्या लेकीनं बाळपणीं गौरीची पूजा केली, लगीन झाल्यावर पांच वर्स मंगळागौरी पुजल्या, सोमव्रत केलं, अनंत पुजला, अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या, चुडेकांकणाच्या आशेनं श्रीकुलस्वामिनी स्नाळसाआईची पूजा केली, जें जें व्रत बायकांनी सांगितलं ते ते केलं, जो जो धर्म कुणीं सांगितला तो तो आचरला, पण अखेर सारं व्यर्थ झालं ! माझ्या हळदीवर नी गळसरीवर दरोडा पडला ! तेव्हां मीं आपली कांकणचोळी श्रीम्हाळसाआईला अर्पण केली! नी तिच्या पायापाशीं आतां आह्मी स्वर्गी सुखाने नांदत आहों ! सखुबाई, रमाबाई, तुह्मी सान्याजणीं वसा आता खालीं ! ताई, त्या ओट्या, ती वाणं नी त्या हळदीकुंकाच्या वाट्या आण इकडे. म्हणजे मी या माझ्या मायबहिणींच्या ओट्या भरते. यांना हळदकुंकू देतं. नी यांना सौभाग्यवायनं वाटते. ( सर्व सामान जवळ आणल्यावर एकएक ची ओटी भरून व तिला कुंकू लावून व एकएक वायन देऊन ) सखुबाई, हे माझ्या हातचं अखेरचंच हळदकुंकू हो ! रमाबाई, माझी आठवण विसरू नका ! नी गंगाबाई, रखमाबाई, तुम्ही सायाजणी माझ्यावर असाच लोभ ठेवा ! ताई ! ही तुझी माई दृष्टीआड झाली ह्मणून हिचा विसर पडू देऊ नको हो ! ही माझी ठुशी तुला घे ! सखुबाई माझ्या आठवणीची ही सरी तुह्मी ठेवा ! नी बायांनो ही माळ, ही नथ, ह्या बाळ्या, तुह्मी घ्या ! तुह्मी सा-याजणीं माझी आठवण ह्मणून