Jump to content

पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

LR0 अंक २ रा. ४३ मग खरंच येणारना तू पुणतांब्याला ? बाबा, आई इतके म्हणते आहे तर चलाना बरें आमच्याबरोबर १ गोपाळ०- वाळा, तिला नाहीं ज्ञान, ह्मणून ती आपली कांहीं तरी बडबडते आहे ! तू नको तिच्या नादी लागू ! म्हाळसा- चुलीत नेऊन घाला ते तुमचं ज्ञान ! मी आपली वेडी आहे तीच बरी ! कसॐ जंक्लं ज्ञान ह्मणतो, त्याच्या नादी लागूनच तर ही आपली अशी दशा करून घेतली आहा ! नी आपल्याबरोबर अम्हांलाही अक्काबाईच्या फे-यांत ओढलीं आहांत ! कोपरापास्नुन हात जोडले आहेत बरं आता आपल्यापुढे. आता हा हट्ट टाकून चला त्या सिद्धांच्या दर्शनाला. म्हणजे डोक्यांतलं हे जळु वेड तरी नाहींसं होईल त्यांच्या कृपादृष्टीनं ! गोपाळ०- गुरुमहाराज, सोडवा मला या जाचांतून ! म्हाळसा०- म्हणजे काय ? उयां अंगाला राख फासून का जायचं आहे गुरूंच्यामागं बैरागी होऊन ? तुह्मी पुष्कळ जाल, पण मी नाहीं हो तुम्हांला जाऊ यायची ! माझी नी माझ्या बाळ्याची वाट लावा अगोदर, नी मग चला तुम्ही हवं तिकडे! पोर सदां चिडलेलं असतं! त्याच्या अंगावर खरूज नायटे उठतात! त्याची सा-यांना चिळस वाटते ! त्यामुळं पोराला कुणी जेवायला खायला बोलावीत नाहींसं झालं आहे ! आमच्या घरांत नाहीं तर लोकांच्या घरीं का होईना, दोन गोड घांस पोराच्या पोटांत जावे असं पुष्कळ वाटतं माझ्या मनाला. पण काय उपयोग ? गोपाळ०- तुमचे पूर्व संचित पडले ना धड ! म्हाळसा०- पोर का माझं एकट्याचंच का आहे, माझी करणी त्याला नडायला ? आपलं संचित होतं ना चांगलं ! मग कां असं व्हावं ? नी माझा करणी याला नडायला मी काय केलं आहे असं ? तुम्हांला असे वेडेचार टाकून द्या, रोजगारधदा करा, दोन पैसे मिळवा, नी प्रपंचतु व साधा अतं ह्मण, हे जर पाप असले तर बरीक न कळे बाई! पण हे जर पाप असतं तर मग एक तरी संसारीक दिसला असता का आपल्याला जगांत ? हा कोण मेला उलटा न्याय ! चला, उठा, स्नान करा, नी दोन ५