Jump to content

पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ श्रीज्ञानेश्वरमहाराज. देखील घरांत उरलं नाहीं ! येतं आहे का ऐकू मी काय बडबडते आहे ते ? का कान फुटले ? जले ते तरी फुटले असते, तर मेलं पुराण तरी बंद पडलं असतं ! ( इतक्यांत बाळ्या येतो त्यास ) बाळ्या, कुठे रे गेला हो. तास इतका वेळ ? तुला शोधून त्रिखंड केलं ! तो तू कुठे जाऊन बसला होतास गोव-या वळीत ? कारट्या, इतका वेळ हातांत नरोटी घेऊन दहा वरं फिरला असतास तर निदान संध्याकाळी पोटभर तरी गिळला असतास ! कुठे गेला होतास ? खरं सांग; नाहीं तर कोलतानंच डागतें बव तुला आतां ! कारट्या तं तसा नी हे असे ! एक राहु नी एक केतु ! छळा ! एक जन्म गांठ पडली आहे, ती पुरी छळून घ्या एकदां. वाळ्या- आई ग-ए आई-आई, मी किनई नरोबा चाव्यांच्याकडे गेलो होतो. अबब! त्यांनी आपल्या भाऊला आणि चिमीला किती किती डागिने केले आहेत ग! मला करशील ग तसे ? आई, नरोबांनी पुणतांब्याच्या बाजारांतून भाऊला कशा छान छान जमती आणल्या आहेत ! बाबा, मला आणाल तशा जमती ? अं-अं-अं-अं. म्हाळसा- वसला मेला डागिने नी जमती ह्मणून रडत ! मेल्या आधी अंग झाकायला धड वस्त्र तरी मिळू दे तुला ! मग डागिने नी जमती ! मी किती दिवस वाणते आहे की, चांगदेव सिद्धांच्या दर्शनाला चलावं ह्मणून ! पण नशीब पडलं ना धड ! तेव्हां माझं सांगणं कुठलं मनांत भरायला ! नरोबा चाटी पडले दैवाचे धड, म्हणून देवानं त्यांना चांगदेव सिद्धांना शरण जाण्याची बुद्धि दिलीन ! नी आम्हांला आठवली अवदसा ! तेव्हां ज्ञानेश्वर हेच आवडले आम्हांला गुरु ! लहानपणी मीच आपल्या हातांनी या नरोबाला कालवण नी तुकडा पचवीत होते ! पण देवानं आतां आम्हांलाच त्याच्या दाराशी जाण्याची वेळ आणलीन ! याचं जल्लं कांहींच का वाटत नाहीं आपल्या मनाला ? तसं नव्हेच पण मुळीं. मी नी माझा बाळ्या आम्हीच आपली जाऊ पुणतांब्याला नी घेऊन