अंक १ ला. २१ आणि या चैतन्याचे सर्वज्ञत्वादि गुण सर्वत्र सर्वकाळ सारखे भरलेले आहेत; मात्र उपाधिभेदाने त्याचे भिन्नत्व जगाला भासते, या गोष्टीची आम्हां सर्वत्रांस साक्ष पटविण्याकरिता आपण साक्षात् श्रीवेदोनारायणाप्रमाणे सांग श्रुतीचे पठण करीत आहां; पण हा क्रम आपण असाच अखंड चालू ठेविल्यास, परम पूज्य श्रुतींचा गुप्तार्थ प्रगट होऊन कर्ममार्गाची बुडवणूक होईल ! आणि त्यामुळे कर्मठांची भ्रांति नष्ट होऊन इहलोकीं यज्ञयागादिक कमें बंद पडतील ! तरी भो महिषा, आतां हें वेदांचे पठण पुरे करावें !! ( महिष वेदपठण थांबवून स्वस्थ उभा राहतो.) विठ्ठल- ( सर्व ब्राह्मणांस साष्टांग नमस्कार घालून ) अहो भूदेवहो, तुह्मी मूर्तिमंत ब्रह्म आहा ! तुमची कांति याज्ञवल्क्यासारखी आहे ! तुह्मी वासिष्ठमुनितुल्य शांत आहां ! तुम्ही विश्वामित्रप्रतिमा आहा ! मनति धराल ते सिद्धीस नेण्यास तुह्मी समर्थ आहा ! तुमचे बोल हे शास्त्राप्रमाणे सर्वांना प्रमाण ५ आहेत ! तेव्हा तुमचे चरणावर मस्तक ठेवून माझी हीच विनंती आहे की, तुह्मी सदय होऊन आह्मां सर्वांना पावन करून घ्यावे. आणि आह्मांस शुद्धिपत्र देऊन या माझ्या अज्ञ मुलांचें मौंजीबंधन करण्याची मला अनुज्ञा द्यावी. ( रुक्मिणीबाईस उद्वेशन ) या श्रेष्ठांना नमस्कार कर. ( रुक्मिणीबाई नमस्कार करते. सर्व ब्राह्मण तिला ‘अखंडसौभाग्यवती भव' असा आशीर्वाद देतात. विट्ठलपंत मुलांस उद्देशून ) आणि बाळांनो, तुह्मीही यांना साष्टांग नमस्कार घालून यांची करुणा भाका. ह्मणजे हे समर्थ दयाई होऊन आपणा सर्वांना शुद्ध करून घेतील! | ज्ञानेश्वर-माझ्या श्रीनिवृत्तिनाथ सद्गुरूंस वंदन करून त्यांच्या अनुज्ञेने, अहो द्विजश्रेष्ठहो, मी तुम्हांस साष्टांग प्राणपात करतों. तुम्ही ईश्वराचे मुख आहां ! तुम्ही धर्माचे रक्षक आहां ! तुम्हां समर्थांच्या अंगीं स्वभावतःच अत्यंत पवित्रता आहे ! तुम्ही पवित्र तीर्थाचे तीर्थरूप आहां! तुमच्या मुखांत वेदनारायण सदां तिष्ठत आहे ! तुम्ही वेदाचे दृढ कवच आहां ! मंत्रविद्येचे माहेर आहां ! कोपानें त्रैलोक्याला भस्म करण्याचे व संतोषाने
पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/31
Appearance